सख्खे भाऊ बनले पक्के वैरी! जमिनीच्या वादातून एकमेकांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:23 PM2020-03-16T21:23:16+5:302020-03-16T21:25:00+5:30

दिल्ली येथील  सिव्हिल लाइन भागात ही घटना घडली आहे.

Delhi shootout in property dispute 2 brothers dead pda | सख्खे भाऊ बनले पक्के वैरी! जमिनीच्या वादातून एकमेकांवर झाडल्या गोळ्या

सख्खे भाऊ बनले पक्के वैरी! जमिनीच्या वादातून एकमेकांवर झाडल्या गोळ्या

Next
ठळक मुद्दे तनुज नागर (27) याचा रात्री 12 च्या सुमारास त्याचा स्वत: चा मोठा भाऊ राहुल नागर (34) याच्याशी वाद झाला.राहुल कोर्टात शिपाई म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवी दिल्ली - जमिनीच्या वादातून सख्खे भाऊ पक्के वैरी बनले आहेत. जमिनीच्या वादातून एक भावाने दुसऱ्या भावावर गोळी झाडली तर दुसऱ्या भावाने बदल्या घेण्यासाठी गोळी झाडली. ही धक्कादायक घटनेत दोन्ही भावांना एकाच वेळी जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली येथील  सिव्हिल लाइन भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुज नागर (27) याचा रात्री 12 च्या सुमारास त्याचा स्वत: चा मोठा भाऊ राहुल नागर (34) याच्याशी वाद झाला. नंतर संतापाच्या भरात तनुजने आपला भाऊ राहुल याला पिस्तुलाने गोळ्या घातल्या. दरम्यान, राहुलनेही तनुजवर गोळी झाडली. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र,डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. राहुल कोर्टात शिपाई म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तर दुसरीकडे, पुल प्रह्लादपूरमध्ये सोमवारी पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमकी झाली. सकाळी दोन चोरटे या चकमकीत ठार झाले. राजा कुरेशी आणि रमेश असं या दरोडेखोरांचं नाव आहे. दोघेही हत्या प्रकरणात पाहिजे आरोपी होते. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी राजा कुरेशी आणि रमेश यांना प्रह्लादपूर भागात पुलावरून पोलिसांनी घेरलं होतं. नंतर दोघांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी केलेल्या गोळीबारात दरोडेखोरांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दोघे जखमी झाले. नंतर दोघांचा मृत्यू झाला या दोघांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात अनेक गुन्हे घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Delhi shootout in property dispute 2 brothers dead pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.