दीपक तलवारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने बजावले समन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:09 PM2019-06-01T16:09:43+5:302019-06-01T16:11:42+5:30

ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

In deepak talwar case Ed summoned to prafull patel | दीपक तलवारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने बजावले समन्स 

दीपक तलवारप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने बजावले समन्स 

Next
ठळक मुद्देआर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपण तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास आनंदी असल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली - दीपक तलवार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल  पटेल यांना ६ जूनला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले आहेत. हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. युपीएचे सरकार असताना नागरी हवाई वाहतूकमंत्रीपदी प्रफुल्ल पटेल हे असताना आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना दिले होते. अशा या चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु आहे.

या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे  दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार आहे. आज ईडीच्या वकिलांनी ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याची माहिती दिली. ईडीने पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपण तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास आनंदी असल्याचे म्हटले आहे. 





 

Web Title: In deepak talwar case Ed summoned to prafull patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.