The decomposed body of a woman was found at the residence | राहत्या घरात सापडला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

राहत्या घरात सापडला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह

ठळक मुद्देशुक्रवारी त्या राहत्या घरी पालथ्या अवस्थेत पडलेल्या पोलिसांना आढळून आल्या.

मुंबई : करी रोड येथील श्री पिंपळेश्वर सोसायटीच्या बी १ विंगमध्ये तळमजल्यावर एका ५५ वर्षीय कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. राहत्या घरी ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.
           

एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हद्दित ५५ वर्षीय महिला एकटी राहण्यास होती. गेले दोन ते तीन दिवस ती घराबाहेर पडली नव्हती, कुजलेला वास येऊ लागल्याने पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. त्यावेळी घराचा दरवाजा तोडून महिलेला बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेतले. शुक्रवारी त्या राहत्या घरी पालथ्या अवस्थेत पडलेल्या पोलिसांना आढळून आल्या. स्थानिकांकड़ून घटनेची माहिती मिळताच एन.एम. जोशी मार्ग पोलीस तेथे दाखल झाले होते. पोलिसांनी महिलेला नायर रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The decomposed body of a woman was found at the residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.