खेळण्यातील बंदूक समजून चालवल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:17 AM2020-06-05T05:17:14+5:302020-06-05T05:17:20+5:30

आटगाव येथील घटना : वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; शहापूर पोलिसांत नोंद

Death of a young man by understanding the toy gun | खेळण्यातील बंदूक समजून चालवल्याने तरुणाचा मृत्यू

खेळण्यातील बंदूक समजून चालवल्याने तरुणाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : खेळण्यातील बंदूक समजून चालवल्याने सिद्धेश जंगम (२८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आटगाव येथे घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भरत शेरे घटनेनंतर फरार झाले आहेत. वाढदिवसाची पार्टी सिद्धेशच्या जीवावर बेतली.


प्रकाश जंगम हे त्यांची पत्नी व मुलगा सिद्धेश याच्यासह आटगाव येथे राहतात. ते स्वत: मध्य रेल्वेत फिटर म्हणून कामाला आहेत. जंगम यांचा १ जून रोजी वाढिदवस तर त्याच इमारतीमधील आलिया नाचरे यांचा ३ जून रोजी वाढदिवस होता. दोघांचा वाढदिवस एकत्र साजरा करायचा ठरविल्याने ३ जून रोजी दुपारी त्याच इमारतीत राहणारे भरत शेरे यांच्या घरात जंगम कुटुंबीय व शब्बीर कावळकर, संदेश मडके, अरमान असे एकत्र येत वाढदिवस साजरा करत होते. जंगम यांना रात्रपाळीला जायचे असल्याने ते दुपारी ३ वाजताच घरी निघून आले. साडेचारच्या सुमारास अरमान नाचरे व इब्राहिम नाचरे हे दोघे जंगम यांच्या घरी आले व जंगम यांना शेरे यांच्या घरी घेऊन गेले. शेरे यांच्या घरी गेले असता सिद्धेश रक्ताच्या थारोळ््यात पडला होता. जंगम यांनी शहापूर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पाहणी केली असता सिद्धेश याच्या पायाजवळ गावठी पिस्तुल आढळले. त्यात २ जिवंत काडतुसे होती. सिद्धेश याला शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


या प्रकरणी प्रकाश जंगम यांनी शहापूर पोलिस ठाण्यात भरत शेरे विरु द्ध तक्रार नोंदविली आहे. स्वत:जवळ बेकायदा गावठी बंदूक बाळगल्याबद्दल तसेच त्या गावठी बंदुकाचा जर कोणी वापर केल्यास मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही ती सुरक्षित ठिकाणी न ठेवल्यामुळे सिद्धेश याचा मृत्य झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Death of a young man by understanding the toy gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.