Crime News: महिला आमदाराच्या घरातून पाच लाखांची चोरी, तपास केला असता घरातलेच निघाले चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 04:19 PM2021-09-13T16:19:11+5:302021-09-13T16:19:11+5:30

Crime News: घरामध्ये ठेवलेल्या पैशांची गरज पडल्यावर आमदारांनी पैसे ठेवलेल्या जागी शोध घेतला असता सदर पैसे सापडले नाहीत, त्यामुळे चोरीची ही घटना समोर आली

Crime News: Theft of Rs 5 lakh from the house of a woman MLA | Crime News: महिला आमदाराच्या घरातून पाच लाखांची चोरी, तपास केला असता घरातलेच निघाले चोर

Crime News: महिला आमदाराच्या घरातून पाच लाखांची चोरी, तपास केला असता घरातलेच निघाले चोर

Next

पाटणा - बिहारमधील नवादा विधानसभा मतदार संघातील आमदार विभा देवी यांच्या घरामधून पाच लाख रुपयांची रोख रक्कम लांबवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. (Crime News) पथरा इंग्लिश गावातील आमदारांच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला. दरम्यान, हे प्रकरण सुमारे दहा दिवसांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. घरामध्ये ठेवलेल्या पैशांची गरज पडल्यावर आमदारांनी पैसे ठेवलेल्या जागी शोध घेतला असता सदर पैसे सापडले नाहीत, त्यामुळे चोरीची ही घटना समोर आली. दरम्यान, या प्रकरणात संशयाची सुई घरातीलच काही नातेवाईकांवर वळली. (Theft of Rs 5 lakh from the house of a woman MLA )

या प्रकरणी राजदच्या आमदारांचे प्रतिनिधी राकेश कुमार यांनी मुफस्सिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.  मात्र कौटुंबिक प्रकरण असल्याने या प्रकाराची जास्त चर्चा न करता ते मिटवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन नातेवाईक आमदारांच्या घरी राहत होते. त्याशिवाय घरात अन्य कुणीही नव्हता. त्यामुळे चोरीच्या घटनेनंतर संशयाची सुई नातेवाईकांकडेच वळली.

आता आमदारांच्या प्रतिनिधिने या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच मुफ्फसिल पोलीस ठाण्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याबाबत पोलीस अधिकारी लाल बिहारी पासवान यांनी सांगितले की, या प्रकरणात घरातील तीन नोकरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. कसून चौकशी केली असता त्यांनी या प्रकरणात अजून एका नोकराचा सहभाग असल्याचे मान्य केले. मात्र हा नोकर सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही नोकरांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. 

Web Title: Crime News: Theft of Rs 5 lakh from the house of a woman MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.