खळबळजनक! "कोणी रडलं तर मी स्वप्नात येऊन घाबरवेन"; WhatsApp स्टेटस ठेवून विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:58 AM2021-06-13T09:58:00+5:302021-06-13T10:06:52+5:30

Crime News : आपल्याला हसत हसत निरोप द्या असंही म्हटलं आहे. या घटनेने परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Crime News student suicide with the licensed revolver and left for parents rewa | खळबळजनक! "कोणी रडलं तर मी स्वप्नात येऊन घाबरवेन"; WhatsApp स्टेटस ठेवून विद्यार्थ्याची आत्महत्या

खळबळजनक! "कोणी रडलं तर मी स्वप्नात येऊन घाबरवेन"; WhatsApp स्टेटस ठेवून विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा घडली असून खळबळ निर्माण झाली आहे. एका विद्यार्थ्याने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. 'आपण गेल्यावर जर कोणी रडलं तर स्वप्नात येऊन घाबरवेन' असं देखील त्याने आपल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. आपल्याला हसत हसत निरोप द्या असंही म्हटलं आहे. या घटनेने परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. मानवेंद्र सिंह असं या 21 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याने सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला देखील ठेवली होती. यामध्ये त्याने "कोणीही रडलं ना तर मी खरंच स्वप्नात येऊन घाबरवेन. मी माझ्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचवण्याची स्वप्न पाहात होतो. मात्र, मी त्यांना मान खाली घालायला लावली. माझी काही चूक नाही आणि जे मी करत आहे, त्यात कोणाचाही हात नाही. प्रत्येकानं मला हसत निरोप द्या. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. कोणीही रडलं नाही पाहिजे" असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मानवेन्द्र सिंहने दुपारी आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केलं आणि वडिलांना खाण्यासाठी फळ देऊन तो आपल्या रुममध्ये गेला. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी मारण्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या रुमकडे धाव घेतली. त्यावेळ त्याने आत्महत्या केल्याचं समजलं. नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्येआधी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं होतं. त्यामध्ये त्याने सर्वांसाठी कोणाही रडू नका एक निरोप दिला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अंधश्रद्धेने घेतला चिमुकल्याचा जीव; करंट लागला म्हणून 5 वर्षीय मुलाला मातीखाली पुरुन ठेवलं अन्...

अंद्धश्रद्धेने एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला करंट (Electric Shock) लागला होता. मात्र  या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात लगेच न नेता त्याच्यावर घरगुती उपचार करण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला आहे. करंट लागला म्हणून चिमुकल्याला मातीखाली पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील शिशगड परिसरामध्ये ही दुर्घटना घडली. याठिकाणी ई रिक्षा चालवणारे रिक्षा चालक भूपेंद्र यांची रिक्षा घराबाहेर चार्ज होत होती. त्याचवेळी त्यांचा मुलगा करण हा त्याठिकाणी आला. मोकळ्या तारेशी त्याचा संपर्क आला आणि त्याला करंट लागला. मुलाला जोरात शॉक बसला होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी कुटुंबीयांनी त्याच्यावर घरगुती उपचार सुरू केले. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी मातीखाली पुरून ठेवण्यात आलं. 

Web Title: Crime News student suicide with the licensed revolver and left for parents rewa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.