Crime News: साधूला मारहाण केली, मग पकडून कापले केस, व्हिडीओ व्हायरल होताच वादाता फुटले तोंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:45 PM2022-05-24T22:45:44+5:302022-05-24T22:46:07+5:30

Crime News: सोशल मीडियावर एका व्हिडीओने सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओमध्ये एक असं दृश्य दिसत आहे ज्यामुळे हिंदू समाजातील लोक खूप संतप्त झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका साधूला काही लोक मारहाण करताना दिसत आहेत.

Crime News: Sadhu beaten, then grabbed and cut hair, video goes viral | Crime News: साधूला मारहाण केली, मग पकडून कापले केस, व्हिडीओ व्हायरल होताच वादाता फुटले तोंड 

Crime News: साधूला मारहाण केली, मग पकडून कापले केस, व्हिडीओ व्हायरल होताच वादाता फुटले तोंड 

Next

भोपाळ - सोशल मीडियावर एका व्हिडीओने सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओमध्ये एक असं दृश्य दिसत आहे ज्यामुळे हिंदू समाजातील लोक खूप संतप्त झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका साधूला काही लोक मारहाण करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी साधूसोबत गैरवर्तन करून त्याचे केसही कापताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातील पटाजन गावातील आहे. यामध्ये साधूला मारहाण केल्यानंतर त्यांचे केस कापण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्याया व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाजारात फिरत असलेल्या साधूला प्रवीण गौर नावाच्या तरुणाने पकडले. त्यानंतर त्याच्यासोबत गैरवर्तन करून शिविगाळ केली.

त्यानंतर त्याने साधूला पकडून न्हाव्याच्या दुकानात नेले. तिथे कैची उचलून त्याने या साधूची जटा कापली. साधूसोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आला आहे. त्यानंतर हिंदू समाजामध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकारानंतर पीडित साधू बेपत्ता झाला आहे. दरम्यान, प्रकरण वाढल्यानंतर खालवा ठाण्याची रोशनी पोलीस चौकीमधील पोलीस साधूचा शोध घेण्यामध्ये गुंतले आहेत.

मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलिसांनी व्हायरल व्हिडीओच्या आधारावर तपासास सुरुवात केली आहे. खंडवाचे  पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, साधूसोबत काही अघटित घडले असावे, अशी शंका हिंदू संघटनांनी उपस्थित केली आहे. मात्र सध्या त्याबाबतचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. आम्ही तपास करत आहोत. साधूचे केस का कापण्यात आले याबाबत काही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

Web Title: Crime News: Sadhu beaten, then grabbed and cut hair, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.