नात्याला काळीमा! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 02:32 PM2021-12-07T14:32:59+5:302021-12-07T14:33:07+5:30

Crime News : मुलीने आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो मृतदेह हा घरामध्येच लपवून ठेवला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Crime News hampshire kimberly heller daughter lived with dead body | नात्याला काळीमा! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का

नात्याला काळीमा! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का

Next

नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एक मुलगी तब्बल सहा महिने आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहिल्याची घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे पैशाच्या हव्यासापोटी मुलीने आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो मृतदेह हा घरामध्येच लपवून ठेवला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

न्यू हँपशायरमध्ये राहणाऱ्या 54 वर्षीय किम्बर्ले हेलर हिने आपल्या आईच्या मृत्यूनंतर आईचा मृतदेह तब्बल सहा महिने घरामध्येच ठेवला. अनेकदा कोणताही मानसिक आजार किंवा त्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमापोटी असं केलं जातं. पण या महिलेचं आईप्रती असलेलं प्रेम नव्हतं तर स्वतःच्या स्वार्थासाठी तिने हे सर्व केलं होतं. महिलेने आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले नाहीत. कारण आईच्या मृतदेहापासून तिला फायदा होणार होता. 

आईवर केले नाहीत अंत्यसंस्कार

किम्बर्ले हेलर हिच्यावर आरोप आहे की तिने आपल्या आईच्या मृत्यूनंतर कोणालाही याची माहिती होऊ दिली नाही. तिने आईवर अंत्यसंस्कारही केले नाहीत आणि घरामध्येच आईचा मृतदेह तसाच ठेवला. बेडफोर्ड पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हेलरच्या आईचा मृत्यू मे महिन्यात झाला होता.18 नोव्हेंबरला हेलरला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेव्हापर्यंत या 54 वर्षीय महिलेने आपल्या आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि ती कोणालाही आपल्या घरामध्ये येऊ देत नव्हती.

मुलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बरेच दिवस हेलरची आई न दिसल्याने लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी हेलरच्या घरी जात तिच्या घरातून सडलेला मृतदेह ताब्यात घेतला. ऑटोप्सीमध्ये समजलं की महिलेचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता मात्र तिच्यापासून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे मुलीने मृत्यूची माहिती सार्वजनिक केली नाही. महिलेचं सोसायटी सिक्योरिटी पेमेंट मृत्यूनंतरही मिळत होतं. याचा वापर महिलेची मुलगी करत होती. आता या मुलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News hampshire kimberly heller daughter lived with dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.