नागपुरात अभिनेत्री रविना टंडन, फराह खान आणि भारतीविरुदध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 07:58 PM2020-02-08T19:58:53+5:302020-02-08T20:03:22+5:30

टीव्हीवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना हास्याची कारंजी उडविण्याच्या प्रयत्नात एका धार्मिक शब्दाचा घाणेरडा अर्थ सांगणे आणि त्यावर हसने सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि हास्य कलावंत भारती सिंग या तिघींच्या अंगलट आले आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात या तिघींविरोधात गुन्हा दाखल झाला.

Crime case registered against Actress Ravina Tandon, Farah Khan and Bharti in Nagpur | नागपुरात अभिनेत्री रविना टंडन, फराह खान आणि भारतीविरुदध गुन्हा दाखल 

नागपुरात अभिनेत्री रविना टंडन, फराह खान आणि भारतीविरुदध गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देधार्मिक भावना दुखावल्याचा आरोप : मानकापूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टीव्हीवर कार्यक्रमाचे सादरीकरण करताना हास्याची कारंजी उडविण्याच्या प्रयत्नात एका धार्मिक शब्दाचा घाणेरडा अर्थ सांगणे आणि त्यावर हसने सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि हास्य कलावंत भारती सिंग या तिघींच्या अंगलट आले आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात या तिघींविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली आहे.
२५ डिसेंबर २०१९ ला सोनी टीव्हीवर बॅक बेंचर्स या कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. फराह खान या कार्यक्रमाची होस्ट होती. तर, रविना टंडन आणि भारती सिंग या दोघी पाहुण्या म्हणून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. फराह खान हिने त्यांना स्पेलिंग एक्स्पर्ट या गेम अंतर्गत एका वाक्याचे इंग्रजी स्पेलिंग लिहिण्यास सांगितले होते. रविनाने बरोबर तर भारतीने चुकीचे स्पेलिंग लिहिले. त्यामुळे फराह खान हिने भारतीला एक संधी देत त्या वाक्याचा अर्थ विचारला होता. भारतीने अत्यंत आक्षेपार्ह्य अर्थ सांगितला. त्यावर या तिघीही खळाळून हसल्या.
विशेष म्हणजे, ज्या वाक्याचा अर्थ विचारण्यात आला होता. ते वाक्या आणि त्याचा अर्थ धार्मिक स्वरूपाचे होते. मात्र, त्याचा आक्षेपार्ह्य अर्थ सांगून या तिघींनी टिंगल टवाळी केली. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दुस-या दिवशी सदर महिलेने मानकापूर ठाण्यात नोंदवली. प्रकरण नाजूक स्वरूपाचे असल्याने गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने ते सल्लामसलतीसाठी वरिष्ठांकडे गेले. विधी अधिका-यांचा सल्ला घेण्यात आला. बरेच चर्चाचर्वण झाल्यानंतर शुक्रवारी या संबंधाने गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे शनिवारी दुपारी १ वाजता तक्रार करणा-या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून ठाणेदार वजिर शेख यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले. त्यावरून रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंग या तिघींवर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कलम २९५ (अ), २९८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीसाठी बोलविणार !
रविना, फराह आणि भारतीला आम्ही या गुन्ह्याच्या संबंधाने चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविणार आहोत. त्यासाठी सोनी टीव्ही तसेच या तिघींना कायदेशिर सूचनापत्र देण्यात येणार असल्याचे मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख म्हणाले.

Web Title: Crime case registered against Actress Ravina Tandon, Farah Khan and Bharti in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.