बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:45 PM2019-05-17T18:45:11+5:302019-05-17T18:48:07+5:30

ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Court rejects bail application of actor Karan Oberoi in rape case | बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

googlenewsNext
ठळक मुद्दे ६ मे ला करणला अटक करण्यात आली होती. अभिनेता करण ऑबेरॉयवर एका महिलेवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

मुंबई - बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज दिंडोशी सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या ज्योतिष महिला बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ऑबेरॉयला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. ६ मे ला करणला अटक करण्यात आली होती. करणने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिला ज्योतिषाने केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली आहे.

जस्सी जैसी कोई नही, स्वाभिमान, साया, जिंदगी बदल सकता है हादसा या मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता करण ऑबेरॉयवर एका महिलेवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, करणने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकवत होता. तसेच तिच्याकडून पैसे उकळले असल्याचे तिने ओशिवारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर करणने मला त्याच्या घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने तिला नारळ पाणी प्यायल्या दिल्यानंतर काही वेळाने ती चक्कर येऊन खाली पडली. त्याचवेळी आरोपीने माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

Web Title: Court rejects bail application of actor Karan Oberoi in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.