CoronaVirus महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांत होती तबलिगी इज्तेमाची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:47 AM2020-04-10T06:47:51+5:302020-04-10T06:48:34+5:30

१४ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत होते नियोजन; पोलिसांच्या विनंतीमुळे संयोजकांनी केले मेळावे रद्द

CoronaVirus Tabiligi Iztema was scheduled in 19 districts in Maharashtra! | CoronaVirus महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांत होती तबलिगी इज्तेमाची तयारी!

CoronaVirus महाराष्ट्रात १९ जिल्ह्यांत होती तबलिगी इज्तेमाची तयारी!

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीतील मरकज येथील धार्मिक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना राज्यात अशा प्रकारे १९ जिल्ह्यांत तबलिगी इज्तेमाचे नियोजन केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. १४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाºया या सोहळ्याची तयारी चार महिन्यांपासून स्थानिक स्तरावर सुरू होती. मात्र कोविड-१९चा संभाव्य धोका ओळखून स्थानिक पोलिसांनी ते स्थगित करण्याची विनंती केली. जमातींच्या मंडळाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मेळावे रद्द केल्याने पुढचा धोका टळला.
राज्यात होणाºया इज्तेमाच्या वेळापत्रकाची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे. त्यांच्या नियोजनाप्रमाणे १४ मार्चला ठाण्यातून जिल्हावार इज्तेमाला प्रारंभ होऊन त्याची सांगता ३ एप्रिलला होणार होती. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरासरी ५० हजार ते एक लाखापर्यंतचे मुस्लीम बांधव जमण्याच्या शक्यतेने मांडव बांधण्यात येत होते. जरी लॉकडाउन जाहीर होईपर्यंत मेळावे झाले असते तरी कोरोनाचा प्रचंड प्रमाणात फैलावाचा धोका होता. मात्र संयोजकांनी पोलिसांची विनंती मान्य केल्याने राज्यापुढील संभाव्य मोठा धोका टळला.

सामुदायिक दुवासाठी जमतो मोठा जमाव
एक दिवसाच्या मेळाव्याची तयारी सुमारे ४ महिन्यांपूर्वीपासून करण्यात येते. इज्तेमात दिवसभर विविध सत्रांत प्रवचन झाल्यानंतर विश्वशांती, बंधुता नांदण्यासाठी ज्येष्ठ मौलवीकडून सामुदायिक दुवा झाल्यानंतर त्याची सांगता होते. त्यानंतर, ४० दिवस किंवा ४ महिने जमातला जाणाºया साथींना रवाना केले जाते.

या होत्या इज्तेमाच्या तारखा :
ठाणे १४ मार्च, रायगड १५, रत्नागिरी १६, सिंधुदुर्ग १७, कोल्हापूर १९, सातारा २०, सांगली २१, सोलापूर २२, उस्मानाबाद २३, लातूर २४, नांदेड २५, परभणी २६,
बीड २७, औरंगाबाद २८, जळगाव २९, धुळे ३१, मालेगाव १ एप्रिल, अहमदनगर २ व पुणे ३

Web Title: CoronaVirus Tabiligi Iztema was scheduled in 19 districts in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.