Coronavirus : विनामास्क पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून पोलिसाचा कान कापला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:52 PM2020-05-23T14:52:40+5:302020-05-23T14:54:59+5:30

Coronavirus : या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Coronavirus : Cut off police's ear as he refused to enter the police station without a mask pda | Coronavirus : विनामास्क पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून पोलिसाचा कान कापला

Coronavirus : विनामास्क पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून पोलिसाचा कान कापला

Next
ठळक मुद्देगुरुवारी अटक आरोपी हा बहादूर नगर पोलीस ठाण्यात आला होता.कर्तव्यावर तैनात असलेल्या हवालदार शाहिद खान यांनी त्याला हटकले. मात्र, तो खान यांच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला.

मास्क न घातल्याने पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून एकाने पोलिसाचा कान आणि हाताचे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी अटक आरोपी हा बहादूर नगर पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याने चेहऱ्याला मास्क न लावल्याने पोलिसांनी त्याला मास्क लावून ये असे सांगितले. पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने तो आला तसा परत गेला. मात्र, काही वेळाने तो परत आला आणि पोलिसांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या हवालदार शाहिद खान यांनी त्याला हटकले. मात्र, तो खान यांच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला.

खान यांनी त्याला लांब उभे राहून बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने स्वत:कडील चाकू काढून खान यांना जखमी केले. त्यांच्या मानेवर चाकूने वार केल्यानंतर त्याने त्यांचा कान कापला. हल्लेखोराला रोखण्यास गेलेल्या पोलीस हवालदार राजेश परिहार यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी काही क्षणात त्याला अटक केली. आरोपी  हा आदिवासी तरुण असून तो रागीट स्वभावाचा असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Web Title: Coronavirus : Cut off police's ear as he refused to enter the police station without a mask pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.