आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 08:59 AM2022-01-22T08:59:28+5:302022-01-22T08:59:44+5:30

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाउस ॲपवर २ ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (१९) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला ३ दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे

Clubhouse app members target Muslim women, Maharashtra cops seek info | आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू

आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू

Next

मुंबई :  सुल्ली डील्स, बुली बाई ॲप पाठोपाठ ऑडिओ चॅट ॲप्लिकेशन असलेल्या क्लब हाउस ॲपवरून महिलांची बदनामी केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली असून फरीदाबाद आणि कर्नाल येथून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाउस ॲपवर २ ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (१९) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला ३ दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे तर, जैशनव कक्कड़ (२१) आणि यश कुमार उर्फ यश पराशर (२२) या दोघांना फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रांझिट रिमांडद्वारे ताब्यात घेतले आहे. कक्कड़ हा वाणिज्य शिक्षण घेत आहेत तर यश वकिलीचे शिक्षण घेत आहे. शेरसिंग का पापा, बाइकर गँग ५, pardhan@haryana-aala या नावाने ते क्लब हाउसवर प्रसिद्ध होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांंबे यांनी दिली. 

@Jaimine या ट्विटर अकाऊंटवर क्लब हाउस ॲपच्या चॅटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. १६ आणि १९ जानेवारी  रोजी हे व्हायरल झाल्याने सर्व स्तरातून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. चौकशीत याचा प्रमुख वक्ता किरा एक्सडी  या आयडीचा असल्याचे स्पष्ट झाले. रझा अकादमीने याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली. १९ तारखेला महिला तक्रारदार पुढे आली. तिच्यासह तिच्या मैत्रिणीच्या फोटोचा वापर करत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. त्यानुसार, गुन्हा नोंदवत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. 

३०० जण ग्रुपमध्ये 
क्लब हाऊसवरील या ग्रुपमध्ये ३०० जण असल्याचे दिसून आले. क्लब हाउस हे ऑडिओ चॅटवर आधारित एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. यामध्ये आवडीच्या विविध विषयांवर आवडीच्या लोकांशी बोलू शकतात किंवा चर्चा करू शकतात. या ॲपला पोलिसांकड़ून पत्र पाठवण्यात येणार आहे. 

बुली बाई ॲप; आरोपींंची समोरासमोर चौकशी
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या बुली बाई ॲप तयार करणाऱ्या नीरज बिश्नोई आणि ओंकारेश्वर या दोघांचा ताबा मुंबई पोलिसांनी घेतला आहे. दुसरीकडे याच प्रकरणात अटक केलेला नीरज सिंहला ओडिसामधून मुंबईत आणण्यात येत आहे. विशाल कुमार झा, श्वेता सिंह, मयंक रावतसह  बिश्नोई आणि ओंकारेश्वर या सर्वाची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. 

Web Title: Clubhouse app members target Muslim women, Maharashtra cops seek info

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.