सिनेस्टाईलने पावणे सात लाखांची बॅग पळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 11:49 AM2020-11-18T11:49:32+5:302020-11-18T11:49:56+5:30

Pune Crime News : पैशांनी भरलेल्या बॅगची पळवापळवी आपण अनेक चित्रपटात पहातो़ अनेकांच्या हातात ती बॅग फिरते़ असाच काहीसा प्रकार बिबवेवाडीत मंगळवारी दुपारी घडला़

Cinestyle stole seven lakh bags | सिनेस्टाईलने पावणे सात लाखांची बॅग पळवली

सिनेस्टाईलने पावणे सात लाखांची बॅग पळवली

googlenewsNext

पुणे - पैशांनी भरलेल्या बॅगची पळवापळवी आपण अनेक चित्रपटात पहातो़ अनेकांच्या हातात ती बॅग फिरते़ असाच काहीसा प्रकार बिबवेवाडीत मंगळवारी दुपारी घडला़ चोरट्याने तब्बल ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली़ 
याप्रकरणी तेजस प्रविण दुगड (वय २९, रा़ वसंतबाग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ दुगड यांच्या बंगल्याचे उघड्या दरवाजावाटे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चोरट्याने आत प्रवेश केला़ त्याने कपाटातील ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड एका बॅगेत भरुन शेजारील फिर्यादी यांच्या भावाच्या बंगल्याच्या आवारात फेकून दिली़ भावाच्या बंगल्यात फेकून दिलेली ही बॅग त्यांचा आचारी देवजी सोळंकी यांना मिळाली़ त्यांनी ती बॅग वहिनी मोनल गौरव दुगड यांना दिली़ त्याचवेळी तो चोरटा शेजारील भावाच्या घरातून तेथे आला़ त्याने मोनल दुगड यांच्या हातामधील बॅग बळजबरीने हिसकावून घेतली व पळत जाऊ लागला़ त्याचा ड्रायव्हर पंजात राऊत याने अडविण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा त्या चोरट्याने त्यांना मारहाण करुन साथीदाराच्या दुचाकीवर बसून चोरटा पळून गेला.

Web Title: Cinestyle stole seven lakh bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.