'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:04 PM2021-03-26T22:04:51+5:302021-03-26T22:05:37+5:30

Crime News : मोठी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या चकमकीत पहिल्यांदाच महिला उपनिरीक्षकाने कारवाईनंतर गुन्हेगार पकडले गेले.

Cinestyle Encounter of female police officers, arrested goons | 'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर

'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर

Next
ठळक मुद्दे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती की, दिल्लीतील दोन कुप्रसिद्ध गुंड दिल्लीत मोठ्या गुन्ह्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येणार आहेत.

नवी दिल्लीदिल्लीपोलिसांची गुन्हे शाखा आणि गुंड यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही गुंडांच्या पायांवर गोळ्या झाडून त्यांना जखमी केले. रोहित चौधरी आणि टीटू या नावाने हे गुंड ओळखले जातात. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका यांच्या गुन्हे शाखेच्या पथकासोबत गुंडांची चकमक झाली. त्यांच्या गोळ्यामुळे हे गुंड जखमी झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या चकमकीत पहिल्यांदाच महिला उपनिरीक्षकाने कारवाईनंतर गुन्हेगार पकडले गेले.

जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण काय आहे

खरं तर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती की, दिल्लीतील दोन कुप्रसिद्ध गुंड दिल्लीत मोठ्या गुन्ह्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी भीष्म सिंह यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार करण्यात आले आणि माहिती संकलित केली गेली. त्यानंतर पोलीस पथकाने प्रगती मैदान परिसरातील भैरव मंदिराजवळ सापळा रचला आणि पोलिसांनी सकाळी ५ वाजताच्या सुमारास एक संशयास्पद कार पाहिली. गुन्हे शाखेच्या पथकाने कार थांबविण्याचा इशारा केला, परंतु कारमधील उपद्रव्यांनी वेग वाढविला, त्यामुळे कारने पोलिसांच्या बॅरिकेट्सला धडक दिली.

स्वत: पकडले जाऊ म्हणून त्या उपद्रव्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांना गोळीबारही करावा लागला. यामुळे रोहित आणि टीटूच्या पायावर गोळ्या लागल्या. एसीपी पंकजच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर आणि उपनिरीक्षक प्रियंका यांच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर एक गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल, पळून जाऊ नये म्हणून गुंडांच्या पायावर गोळी मारावी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार राउंड गोळीबारानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन अर्ध स्वयंचलित पिस्तूल आणि कार जप्त केली आहे. रोहितवर ४ लाख आणि टीटूवर दीड लाखांचे बक्षीस असून या दोघांवर गुन्हे शाखेच्या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Web Title: Cinestyle Encounter of female police officers, arrested goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.