धक्कादायक! आरेमध्ये इमारतीवरून पडून बाल टीव्ही कलाकार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:58 PM2019-07-03T19:58:39+5:302019-07-03T20:05:43+5:30

शरीरसुखाला नकार दिल्याने प्रियकराने दिला धक्का

child TV artist seriously injured by fall down from Aarey building | धक्कादायक! आरेमध्ये इमारतीवरून पडून बाल टीव्ही कलाकार गंभीर जखमी

धक्कादायक! आरेमध्ये इमारतीवरून पडून बाल टीव्ही कलाकार गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देआरे पोलिसांनी प्रियकराला मंगळवारी अटक केली आहे.शारीरिक सुखाला नकार दिल्याच्या रागात ही प्रकार करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले चौदा वर्षीय टीव्ही कलाकार मुलगी गंभीर जखमी झाली असून, ‘सावधान इंडिया’ या मालिकेत तिने काम केले होते.

मुंबई : राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून चौदा वर्षीय टीव्ही कलाकार मुलगी गंभीर जखमी झाली असून, ‘सावधान इंडिया’ या मालिकेत तिने काम केले होते. शारीरिक सुखाला नकार दिल्याच्या रागात ही प्रकार करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले असून, आरे पोलिसांनी प्रियकराला मंगळवारी अटक केली आहे.
नीला (नावात बदल) ही चौदा वर्षांची मुलगी गोरेगाव पूर्वच्या आरे परिसरात सोळा मजली इमारतीत एक बहीण आणि आईवडिलांसह राहत होती. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर तिचा प्रियकर अंकित (नावात बदल) राहत होता. अंकित नीलाला शरीरसुखासाठी सतत त्रास द्यायचा. मात्र, ती त्याला नकार देत होती.२६ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने नीलाला इमारतीच्या टेरेसवर भेटायला बोलावले होते. त्यावेळीदेखील त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हाही त्यांच्यात वाद झाले आणि अखेर रागाच्या भरात अंकितने नीलाला धक्का दिला आणि घरी निघून
गेला. रहिवाशांनी जखमी अवस्थेत सापडलेल्या नीलाबाबत तिच्या घरच्यांना कळविले. तिला सुरुवातीला सेव्हन हिल्स आणि तिथून धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

अटक आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

नीलाने आत्महत्या केलेली नसून, तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय घरच्यांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार, अंकितला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यानेच नीलाला धक्का दिल्याचे पोलिसांकडे कबूल केले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Web Title: child TV artist seriously injured by fall down from Aarey building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.