चाईल्ड पोर्नोग्राफीचे राज्यात १२५ गुन्हे अन् ४० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:16 PM2020-03-12T13:16:39+5:302020-03-12T13:18:57+5:30

मुंबई सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले आहे.

Child pornography's 125 cases registered and 40 arrested in state pda | चाईल्ड पोर्नोग्राफीचे राज्यात १२५ गुन्हे अन् ४० जणांना अटक

चाईल्ड पोर्नोग्राफीचे राज्यात १२५ गुन्हे अन् ४० जणांना अटक

Next
ठळक मुद्देसाहिब शक्ती मोदक (२२) असे या आरोपीचे नाव आहे. राज्यात एकूण १२५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४० जणांना अटक करण्यात आली मोहिमेअन्वये एनसीआरबीला (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) २५००० केसेस रिपोर्ट झाल्या आहेत. 

मुंबई - भारतात कायद्याने चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. ही अत्यंत गंभूर आणि संवेदनशील बाब असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम युट्युब, गुगल, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, इमगुर या सारख्या सोशल मीडियाद्वारे इंटरनेटचा गैरवापर करून बालकांच्या लैंगिक शोषणाबाबतचे, अश्लील व्हिडीओ किंवा फोटो वायरल केले जातत. याप्रकरणी राज्यात एकूण १२५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबई सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले आहे. अशाच गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी साकीनाकातून एका भाजीवाल्याला अटक केली होती. नुकतीच अशा गुन्ह्यात आणखी एकाला अटक केली आहे. साहिब शक्ती मोदक (२२) असे या आरोपीचे नाव आहे. मोदकने त्याच्या गुगल ड्राइव्हवरून अनेक अल्पवयीन मुला-मुलींचे फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले.
 

चाईल्ड पोनोग्राफीची गंभीर दाखल गृहमंत्रालयाने घेतली आहे. जगभरात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांना नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिका ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत घटनांचा पाठपुरावा करत असते. त्याचा भाग म्हणून एनसीएमईसी ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफीच्याबाबत कृत्यांवर लक्ष ठेवून असते. त्यांना याबाबत प्राप्त झालेली माहिती एफबीआयमार्फत संबंधित देशातील तपास यंत्रणांना पुरवीत असतात. त्याच मोहिमेअन्वये एनसीआरबीला (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) २५००० केसेस रिपोर्ट झाल्या आहेत. 


 मुंबईत ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. साहिबने मोदकने ही काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यानुसार त्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच सायबर पोलिसांनी साकीनाका येथे राहणाऱ्या हरिप्रसाद पटेल विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. पटेल याने गेल्या वर्षी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लहान मुलांचा एक अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याचे अकाऊंट बंद केले. तरी देखील हरिप्रसाद याने मित्राच्या मोबाइलवरून नवीन अकाऊंट तयार केले आणि पुन्हा लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल त्याला अटक केली होती. सध्या पटेल या पोलिसांच्या कोठडीत आहे.

Web Title: Child pornography's 125 cases registered and 40 arrested in state pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.