माझ्याशी शारीरिक संबंध ठेव! भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीला ऑफर; महिलेनं चपलेनं धू धू धुतलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:24 AM2021-08-25T11:24:40+5:302021-08-25T11:25:01+5:30

पंधरा दिवसांत दोनदा महिलेला सेक्सची ऑफर; दुकानात घुसून महिलेची नगरसेवकाला मारहाण

Chhattisgarh BJP Councilor Beats Up Friends Wife For Denying Sexual Favour | माझ्याशी शारीरिक संबंध ठेव! भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीला ऑफर; महिलेनं चपलेनं धू धू धुतलं 

माझ्याशी शारीरिक संबंध ठेव! भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीला ऑफर; महिलेनं चपलेनं धू धू धुतलं 

googlenewsNext

बलौदाबाजार: भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडच्या बलौदाबाजार जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. भाजप नगरसेवकानं मित्राच्या पत्नीला सेक्सची ऑफर दिली होती. त्यामुळे संतापलेल्या महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली. मात्र चपलेनं मारहाण करूनही नगरसेवक सुधारला नाही. त्यानं १५ दिवसांनंतर पुन्हा महिलेला शारीरिक संबंधांची ऑफर दिली. त्यानंतर महिला सोमवारी नगरसेवकाच्या कार्यालयात पोहोचली. तिथे नगरसेवकानं त्याच्या मित्रासह महिलेला मारहाण केली. आता पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर नगरसेवक फरार आहे.

सिमगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. नगरसेवक १५ दिवसांपूर्वी त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यानं मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. वहिनी आणि दिरामध्ये असे संबंध चालतात, असं नगरसेवकानं म्हटल्याचा आरोप महिलेनं केला. यामुळे महिला संतापली. महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारलं. तिच्या पतीनं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं नगरसेवकाला मारहाण केली.

यानंतर १५ दिवसांनी भाजप नगरसेवक सूर्यकांत ताम्रकरनं पुन्हा महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. त्यानं महिलेला तसा मेसेज केला. यानंतर महिला एका तरुणीला सोबत घेऊन आरोपी नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात काठी घेऊन पोहोचली. तिनं आरोपीला काठीनं मारहाण केली. त्यानंतर नगरसेवक आणि त्याच्या मित्रानं महिला आणि तरुणीला जमिनीवर आपटलं. दोघांचे केस खेचून त्यांना बेदम मारलं. यावेळी दुकानाजवळ मोठी गर्दी जमली. त्यातील काहींनी घटनेचं चित्रिकरण केलं.

Web Title: Chhattisgarh BJP Councilor Beats Up Friends Wife For Denying Sexual Favour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा