धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला

By कुणाल गवाणकर | Published: January 2, 2021 12:03 PM2021-01-02T12:03:36+5:302021-01-02T12:05:11+5:30

पोलिसांकडून आई आणि तिच्या प्रियकराला अटक; पीडित मुलीनं दिला बाळाला जन्म

chennai woman lets boyfriend rape impregnate 15 year old daughter | धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला

धक्कादायक! तुझा प्रियकर बलात्कार करतो; तक्रार करणाऱ्या मुलीला आईनं दिला 'सहकार्या'चा सल्ला

Next

चेन्नई: माय-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार चेन्नईत घडला आहे. एका आईनं स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराची परवानगी दिली. त्यामुळे १५ वर्षीय मुलगी गरोदर राहिली. तिनं एका बाळाला जन्म दिला. यानंतर पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. 

३६ वर्षांची नंदिनी (नाव बदलण्यात आलं आहे) काही वर्षांपूर्वी पतीपासून वेगळी झाली. त्यानंतर तिचे ३२ वर्षांच्या सेकरशी प्रेमसंबंध होते. शोलिनगानाल्लुरचा रहिवासी असलेला सेकर रंगारी काम करतो. नंदिनीला भेटण्यासाठी येणाऱ्या सेकरनं तिच्या १५ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. याची तक्रार मुलीनं नंदिनीकडे केली. त्यावर नंदिनीनं पीडित मुलीला सहकार्य कर, असा सल्ला दिला.

सेकर करत असलेल्या बलात्कारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नंदिनीनं तिला आपल्या भावाकडे पाठवलं. मुलगी गरोदर असल्याची माहिती तिनं भावाला दिली नाही. त्यानंतर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मामांना सांगितला. त्यानंतर त्यांनी नंदिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. 

नंदिनीचा शोध न लागल्यानं मामांनी मडीपक्कम येथील महिला पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत नंदिनी आणि सेकरवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलीला पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं. तिथं तिनं ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिला. नंदिनी आणि सेकरचा शोध घेणाऱ्या पोलिसांना डिसेंबरमध्ये मोठं यश मिळालं. ३० डिसेंबरला दोघांनाही अटक करण्यात आली.
 

Web Title: chennai woman lets boyfriend rape impregnate 15 year old daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.