पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:14 AM2019-12-17T06:14:49+5:302019-12-17T06:15:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) ...

Charges filed by ED on HDIL's promoter for PMC Bank | पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल

पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) चे प्रमोटर राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांच्यावर विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी दोषारोपपत्र दाखल केले.


ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे ७,००० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. ईडीने वाधवा यांच्यावर प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
सुरुवातीला या दोघांनाही मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) अटक केली. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ईडीने या दोघांचा ताबा घेतला.


१६ लाख खातेदार असलेल्या पीएमसी बँकेने मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याने २३ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने या बँकेवर प्रशासक नेमला. सध्या या बँकेचा व्यवहार प्रशासन पाहत आहे.


बँकेने एचडीआयएलला ६,७०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेसंबंधित सर्व नियमांना धाब्यावर बसवून पीएमसी बँकेने एचडीआयएलला कर्ज दिले. गेले काही वर्ष एचडीआयएलने कर्जाचे हफ्ते न दिल्याने बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. त्यात भर म्हणजे एचडीआयएलही दिवाळखोरीत निघाली. बँकेने खातेदारांची रक्कम वापरल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यावर आरबीआयने निर्बंध घातले. या निर्बंधाविरोधात खातेधारकांनी अनेक निदर्शने केली व उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आतापर्यंत या घोटाळ्याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पीएमसी बँकेच्या व एचडीआयएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Charges filed by ED on HDIL's promoter for PMC Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.