जळीतकांड प्रकरणात आरोपीचे वकिल गैरहजर उलट तपासणीचे कार्य अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:06 PM2021-05-03T18:06:12+5:302021-05-03T18:06:36+5:30

Crime Case : आरोपीचे वकिल भुपेन्द्र सोने न्यायालयात गैरहजर राहिल्याने उलटतपासणी होऊ शकली नाही.

In the case of arson, the accused's lawyer is absent | जळीतकांड प्रकरणात आरोपीचे वकिल गैरहजर उलट तपासणीचे कार्य अपूर्ण

जळीतकांड प्रकरणात आरोपीचे वकिल गैरहजर उलट तपासणीचे कार्य अपूर्ण

Next
ठळक मुद्दे विशेष सरकारी विधीतज्ञ  उज्वल निकम  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा कामकाजाची पाहणी करीत होते.

हिंगणघाट ( वर्धा) - जळीतकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव व फ्रांसिस परेरा यांची साक्ष झाल्याने बचाव पक्षा कडून उलट तपासणी करीता सोमवारी आरोपीचे वकिल ऍड. भुपेन्द्र सोने न्यायालयात गैरहजर राहिल्याने उलटतपासणी होऊ शकली नाही.
     

जळीतकांड प्रकरणाचे बचाव पक्षाचे ऍड. सोने यांचे वतीने त्याचे सहकारी वकील यांनी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांच्या समोर अर्ज सादर करुन ऍड. सोने प्रकृत्तीचे कारणामुळे  गैरहजर आहे असे सांगितले. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणीचे कामकाज होऊ शकले नाही.  ३ व ४ मे ला होणारी सुनावणी ऍड. सोनेच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाने या प्रकरणातील पुढील तारीख  ७ मे ला ठेवण्यात आली.  विशेष सरकारी विधीतज्ञ  उज्वल निकम  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा कामकाजाची पाहणी करीत होते. परंतु त्याचे पदरी निराशा पडली. ऍड. निकम यांना स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ऍड.दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.

Web Title: In the case of arson, the accused's lawyer is absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.