बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:15 AM2021-05-11T07:15:03+5:302021-05-11T07:16:03+5:30

२७ मार्च २०२१ रोजी व्यावसायिक अफजल व त्याचा मित्र खालीद याच्याविराेधात आंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

businessman robbed of millions, model and her friend charged with ransom | बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा

Next

भिवंडी : शहरातील कापड व्यावसायिकाला मुंबईतील एका माॅडेलने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून लाखाें रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी या माॅडेलवर आणि तिच्या मित्रावर भाेईवाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अफजल इजहार शेख (वय ३७) असे व्यावसायिकाचे नाव असून, त्यांचा कपड्यांच्या कटिंग स्क्रॅबचा व्यवसाय आहे. अफजल याचा मित्र इसा अनीस अन्सारी (रा. गैबीनगर) याने अफजल याची ओळख त्याची मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील एका मैत्रिणीशी करून दिली होती. त्यानंतर तिने फोनवरून पैशांची अडचण असल्याचे अफजलला सांगितले. अफजलने इसा याच्याशी चर्चा करून तिला टप्प्याटप्प्याने पाच लाख रुपये दिले. त्यानंतर दाेघांमध्ये घट्ट मैत्री हाेऊन त्यांच्यात शरीरसंबंध झाले. यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात वेब सिरीजमध्ये २५ लाखांची गुंतवणूक करून महिना पाच लाख रुपये कमावण्याचे प्रलाेभन तिने दिले. मात्र, अफजलने मित्राचा सल्ला घेऊन नकार दिला.

त्यानंतर या तरुणीने अफजल याच्याची वारंवार फोन व व्हाॅट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अफजलने तिला प्रतिसाद दिला नाही. यानंतर या तरुणीने सप्टेंबर, ऑक्टाेबर २०२० मध्ये फाेन करून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. अखेर २८ जानेवारी २०२१ मध्ये मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अफजल व त्याचा मित्र खालीद शेख यांच्याविराेधात बलात्काराची तक्रार दाखल केली. 

त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी २० लाखांची मागणी केली. त्यानंतर अफजलने तीन लाख रुपये मित्राकरवी या तरुणीकडे पाठवले. उर्वरित रक्कम तक्रार मागे घेतल्यानंतर देतो, असे सांगितले. मात्र, तिने २० लाख दिल्यानंतरच तक्रार मागे घेईन, अशी भूमिका घेतली.

दाेघांना अटक  
२७ मार्च २०२१ रोजी व्यावसायिक अफजल व त्याचा मित्र खालीद याच्याविराेधात आंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. अखेर पैसे उकळल्या प्रकरणी अफजल याने तरुणी आणि तिचा मित्र इसा यांच्याविराेधात भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या दाेघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.
 

Web Title: businessman robbed of millions, model and her friend charged with ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.