राकेश पाटील हत्येमागे बिल्डराच्या हस्तकाचा हात, इमारतीच्या ग्रिलच्या कामावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:28 PM2020-10-29T14:28:27+5:302020-10-29T14:29:36+5:30

Murder : या हत्येचा मुख्य सुत्रधार हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीकाचा हस्तक आहे. त्यामुळे नेमकी हत्या ग्रिलचे काम घेण्यावरुन झाले आहे की इतर कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहे.

Builder's aide hand behind Rakesh Patil's murder, dispute over building grill work | राकेश पाटील हत्येमागे बिल्डराच्या हस्तकाचा हात, इमारतीच्या ग्रिलच्या कामावरुन वाद

राकेश पाटील हत्येमागे बिल्डराच्या हस्तकाचा हात, इमारतीच्या ग्रिलच्या कामावरुन वाद

googlenewsNext
ठळक मुद्देया हत्येतील मुख्य आरोपी डी. मोहन हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीका हस्तक आहे. त्यामुळे या हत्येमागे बिल्डरचा काही सहभाग आहे का याचा देखील पोलीस तपास करित आहेत.

अंबरनाथ : पालेगाव आणि अंबरनाथ गांव परिसरात नव्याने विकसीत होणा-या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन राकेश पाटील यांची हत्या झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या हत्येचा मुख्य सुत्रधार हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीकाचा हस्तक आहे. त्यामुळे नेमकी हत्या ग्रिलचे काम घेण्यावरुन झाले आहे की इतर कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान या हत्येतील 10 आरोपींपैकी चार आरोपींना पोलीसांनी रात्री 8 वाजताच अटक केली आहे.
          

अंबरनाथ मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची जैनम रेसिडेन्सी इमारच्या आवारात 10 हल्लेखोरांनी संगणमत करुन हत्या केली होती. या हत्येनंतर सर्व आरोपी आपल्या कारमधुन पसार झाले होते. त्यातील काही आरोपी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कारने मुरबाडच्या दिशेने जातांना त्यांना अटक करण्यात आली. त्यात विनायक पिल्ले, अक्तर खान, विजय दासी आणि रमेश दासी यांचा समावेश आहे. दरम्यान राकेश पाटील यांचा भाऊ अजय पाटील याने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत या हत्येमागे मुख्य आरोपी हा डी. मोहन असुन त्याचा देखील त्यात सहभाग असल्याचे नमुद केले आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार डी. मोहन, भरत पाटील, विनायक पिल्ले, अक्तर खान, विजय दासी, राजू दासी, रमेश दोहार आणि इतर तीन अशा 10 जणांनी मिळून ही हत्या केल्याचे नमुद केले आहे. या 10 आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येतील मुख्य आरोपी डी. मोहन हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीका हस्तक आहे. त्यामुळे या हत्येमागे बिल्डरचा काही सहभाग आहे का याचा देखील पोलीस तपास करित आहेत.

Breaking : खळबळजनक! मनसेच्या उपशहराध्यक्षाची भररस्त्यात धारदार शस्त्राने केली हत्या


दरम्यान राकेश पाटील यांच्या हत्येमागे नेमके कारण फिर्यादीत जे नमुद करण्यात आले आहे त्यात जैनम रेसिडेन्सी येथे नव्या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्यावरुन डी मोहन आणि पाटील यांच्यात वाद असल्याने ही हत्या केल्याचे म्हंटले आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असुन इतर सहा आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.



 

Web Title: Builder's aide hand behind Rakesh Patil's murder, dispute over building grill work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.