फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:44 PM2021-09-23T19:44:24+5:302021-09-23T19:47:34+5:30

Crime Case : ११ सप्टेंबर राेजी मारहाण केल्यानंतर काही दिवसांतच जखमी असलेल्या सुनील गवई यांचा मृत्यू झाला़.

Brother and Sister kills neighbor over firecrackers | फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजाऱ्याची हत्या

फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजाऱ्याची हत्या

Next
ठळक मुद्दे लाेखंडी पाइप व राॅडने केली मारहाण गंभीर जखमी झाल्यानंतर तीन दिवसांतच झाला मृत्यू

अकाेला : ताथाेडनगर येथील रहिवासी एका इसमाची शेजारीच रहिवासी असलेल्या बहीण व भावाने फटाका का फाेडला, असे म्हणत लाेखंडी पाइप व राॅडने मारहाण करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली़. ११ सप्टेंबर राेजी मारहाण केल्यानंतर काही दिवसांतच जखमी असलेल्या सुनील गवई यांचा मृत्यू झाला़. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पाेलिसांनी खुनासह ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरू केला आहे़.

माेठी उमरी परिसरात असलेल्या ताथाेडनगर येथील रहिवासी सुनील लक्ष्मण गवई वय ४२ वर्षे यांनी ११ सप्टेंबर राेजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात बसवलेल्या गणपतीसमाेर फटाका फाेडला हाेता़. याच कारणावरून त्यांचेच शेजारी असलेले वृंदन विष्णू जाधव व त्याची बहीण सकू विष्णू जाधव यांनी दाेघांनी लाेखंडी पाइपने सुनील गवई यांना बेदम मारहाण केली़ त्यानंतर गवई जमिनीवर काेसळताच या दाेघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत लाेटपाट केली़. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनील गवई यांना तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले़ मात्र, येथील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले़. गवई यांच्यावर उपचार सुरू असतानाच तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला़. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पाेलिसांनी सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला हाेता़ मात्र गवई यांचा मृत्यू झाल्यानंतर वृंदन जाधव व त्याची बहीण सकू जाधव या दाेघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला़ यासाेबतच ॲट्राॅसिटी ॲक्ट अन्वयेही गुन्हा दाखल काण्यात आला आहे़. या प्रकरणातील आराेपी बहीण- भाऊ फरार असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़.

.

Web Title: Brother and Sister kills neighbor over firecrackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.