लग्न करण्यास तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 05:16 PM2020-10-13T17:16:28+5:302020-10-13T17:16:58+5:30

Murder : दोन वर्षापासून होते प्रेमसंबध: आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

The boyfriend strangled his girlfriend and killed her | लग्न करण्यास तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून केली हत्या 

लग्न करण्यास तगादा लावल्याने प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून केली हत्या 

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्वा मेश्राम (१७) रा. मूर्री असे मृत प्रेयसीचे नाव आहे. तर उमाशंकर ओंकार कटरे (१८) रा. संजयनगर मूर्री असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

गोंदिया: दोन वर्षापासून प्रेम संबध असलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार केले. नंतर तिला तलावाच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना १३ आॅक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता घडली.  या घटनेसंदर्भात आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


पूर्वा मेश्राम (१७) रा. मूर्री असे मृत प्रेयसीचे नाव आहे. तर उमाशंकर ओंकार कटरे (१८) रा. संजयनगर मूर्री असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. मागील दोन वर्षापासून असलेल्या प्रेमसंबधाला घेऊन पूर्वा त्याला लग्न करण्यास म्हणत होती. लग्नासाठी ती त्याला तगादा लावत होती. मात्र आरोपी तिच्याशी लग्न करण्यास टाळायचा. वारंवार याच प्रकरणामुळे वैतागलेल्या उमाशंकरने तिचा काटा काढण्याचा चंग बांधला. १२ आॅक्टोबरच्या सायंकाळी तिला भेटण्यासाठी बालावले. ती भेटण्यास गेल्यावर त्यांच्यात खूपच चर्चा रंगल्या. परंतु ती लग्नाचा अट्टाहास घेऊन होती तर तो लग्नास टाळायचा. यामुळे त्या दोघांत शाब्दीक चकमक उडाली. परिणामी त्याने १३ आॅक्टोबरच्या पहाटे २.३० वाजता तिचा गळाआवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह तलावातील पाण्यात टाकला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोललीस अधिकारी जगदीश पांडे, ठाणेदार बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, कैलाश गवते व ईतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

Web Title: The boyfriend strangled his girlfriend and killed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.