धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, पोलिसांसमोर त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:36 IST2025-12-02T09:35:27+5:302025-12-02T09:36:39+5:30
गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये, एका तरुणाला त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. पण, अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, पोलिसांसमोर त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुजरातमधील सौराष्ट्रमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तरुणाचा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृताचे नाव नरेंद्र सिंह ध्रुवेल होते, तो मूळचा मध्य प्रदेशचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली होती. ही घटना सौराष्ट्रातील एका सिरेमिक कारखान्यातील कामगार वसतिगृहात घडली, तिथे ते गेल्या तीन महिन्यांपासून राहत होते. एक दिवस त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात नरेंद्रने त्याची मैत्रीण पुष्पा देवी मरावी हिला लाकडी काठी आणि पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मरावीला गंभीर दुखापत झाली. त्याने चेहऱ्यावर चावाही घेतला. गंभीर जखमी झाल्यानंतर मरावीचा मृत्यू झाला.
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गंभीर दुखापती आणि शारीरिक वेदनांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. ध्रुवेलला अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.
रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नरेंद्रला छातीत दुखू लागले. पोलिसांनी त्याला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नरेंद्रच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील २५ वर्षीय रहिवासी नरेंद्र सिंह हा मोरबीतील लखधीरपूर गावाजवळील लेक्सस सिरेमिक्समध्ये काम करत होता. त्याला अनुपपूर जिल्ह्यातील २० वर्षीय पुष्पा देवी हिच्या प्रेमात पडले आणि ते दोघे एकत्र मोरबीला राहायला गेले. ते तीन महिन्यांपासून एकत्र राहत होते. दोघेही लेक्सस सिरेमिक्समध्ये कामगार होते. मध्य प्रदेशहून परतल्यानंतर काही दिवसांतच भांडणे सुरू झाली.
गंभीर जखमी अवस्थेत सोडून गेला
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला, यामध्ये नरेंद्रने पुष्पा देवींना बेदम मारहाण केली. पुष्पा गंभीर जखमी झाली. नरेंद्र तिला तिथेच सोडून पळून गेला. गंभीर जखमी झाल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्र परत आल्यावर त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला,पण पुष्पाचा मृत्यू झाला. त्यांनी ११२ ला फोन केला आणि पुष्पा देवी यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला.