प्रियकराने महिलेला फोन करून बोलावले अन् दोन मित्रांसह केला गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 06:50 PM2020-09-15T18:50:39+5:302020-09-15T18:51:02+5:30

ज्या कारमध्ये ही घटना घडली होती, ती कारही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

The boyfriend called the woman and gangraped her with two friends | प्रियकराने महिलेला फोन करून बोलावले अन् दोन मित्रांसह केला गँगरेप 

प्रियकराने महिलेला फोन करून बोलावले अन् दोन मित्रांसह केला गँगरेप 

Next
ठळक मुद्दे फोन कॉलवर झालेल्या मैत्रीनंतर महिलेची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे की, प्रियकरने आपल्या दोन मित्रांसह एकत्रितपणे बलात्काराची घटना घडवून आणली आहे.

उत्तर प्रदेशातबलात्काराच्या घटना सतत समोर येत आहेत. सीतापूर आणि बलियानंतर मेरठमध्ये एका महिलेवर कारमधील सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला खासगी रुग्णालयात काम करते. ही घटना त्याचवेळी आहे ,जेव्हा ती घरी जात होती. ही घटना सोमवारी रात्रीची आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तीन जणांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मेरठचे एसएसपी अजय सहनी यांनी दिली. ज्या कारमध्ये ही घटना घडली होती, ती कारही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

फोन कॉलवर झालेल्या मैत्रीनंतर महिलेची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे की, प्रियकरने आपल्या दोन मित्रांसह एकत्रितपणे बलात्काराची घटना घडवून आणली आहे. यापूर्वी सीतापुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. परिसरातील पाच जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. या घटनेचा अश्लील व्हिडिओही आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर बनवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच बलियामध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. असे सांगितले जात आहे की, गुंडांनी प्रथम मुलीला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील एसपी यांनी सांगितले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

 

Web Title: The boyfriend called the woman and gangraped her with two friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.