Both of them were arrested with weapon in Dighi area | दिघी परिसरात बोकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक 
दिघी परिसरात बोकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक 

ठळक मुद्देआरोपीकडून ५० हजार ४०० रूपयाचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी खंडणी व दरोडा विरोधी पथकाने दिघी परिसरात शुक्रवारी दोन आरोपींना पिस्तुलसह अटक केली. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक उर्फ पद्या प्रकाश तापकीर, वय २६, रा. म.फुले शाळेजवळ, भोसरी) तसेच किरण संजय कटके (वय २३, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रतिक यांच्याकडून २५ हजार २०० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल तसेच एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच किरण संजय कटके या आरोपीकडून ५० हजार ४०० रूपयाचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. खंडणी व दरोडा विरोधी पथकाने आरोपींना दिघी मॅग्झिन चौक भोसरी येथून ताब्यात घेतले.

Web Title: Both of them were arrested with weapon in Dighi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.