गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह 

By पूनम अपराज | Published: January 11, 2021 08:10 PM2021-01-11T20:10:08+5:302021-01-11T20:11:21+5:30

Suicide Case : माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिकारी उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

The body of a female police officer was found strangled | गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह 

गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह 

Next
ठळक मुद्देमोहनलालगंजच्या पोलिसांनी सांगितले की, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती.

मोहनलालगंज कोतवालीच्या पीआरव्ही (पोलिस रिपोर्टिंग व्हेइकल) मध्ये तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला वर्मा (वय 24) यांनी रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. ती शहरातील मऊ भागात वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिकारी उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.
 

मोहनलालगंजच्या पोलिसांनी सांगितले की, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती. मात्र ती ड्युटीवर पोहचली नव्हती. इतक्यात तिच्या वसतिगृहातील एक ओळखीचा माणूस आला आणि खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावत राहिला. जेव्हा दार उघडले नाह तेव्हा त्याने बाजूच्या एका महिला नर्सला सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने खोलीच्या दुसऱ्या दारातून आतील बाजूस पाहिले तेव्हा उर्मिलाचा मृतदेह ओढणीने पंखावर लटकलेला पाहून ती स्तब्ध झाली.

त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर एसीपी प्रवीण मलिक, डीसीपी दक्षिण रवि कुमार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवण्यात आला. उर्मिलाच्या घरातील सदस्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. उर्मिलाच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. तिचा मोबाइलही योगायोगाने सापडला नाही. मोबाइलचा तपास केला जात आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांचा शोध घेण्यात येत आहे. उर्मिलाचे कुटुंब आल्यावरच काही माहिती मिळेल.

 

Web Title: The body of a female police officer was found strangled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.