पैशांचा काळाबाजार सुरु; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 05:45 PM2019-09-23T17:45:25+5:302019-09-23T17:47:05+5:30

हे प्रकरण चौकशी करता प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

Black market of money has started; Police has detained a political party worker | पैशांचा काळाबाजार सुरु; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

पैशांचा काळाबाजार सुरु; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

Next
ठळक मुद्देया बेहिशोबी मालमत्तेची लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होऊन बारा तास उलटत नाहीत तोवर मंबईत पैशांचा काळाबाजार सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ६६ लाख रुपयांची रोकड पकडली आहे. या बेहिशोबी मालमत्तेची लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पैशांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यासाठी हे प्रकरण चौकशी करता प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

राज्यात निवडणुकीचे पडसाद उमटत असताना राजकीय कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून पैशांची अफरातफर करण्याची शक्यता असते. मुंबईच्या भुलेश्वर पोफळवाडी परिसरातून शनिवारी मुंबई पोलिसांनी एका कार्यालयातून पहिल्याच दिवशी तब्बल ६६ लाख रुपये हस्तगत केले आहेत. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांना या बेहिशोबी पैशाची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते. हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. त्यातच ही कारवाई झाली असून टाकलेल्या या छाप्यामध्ये हस्तगत केलेली रक्कम आणि त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Black market of money has started; Police has detained a political party worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.