Bihar shaked! BJP leader shot dead in broad daylight in bihar | बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बिहार हादरलं आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात आज सकाळी ही घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे जयंत मंडलचे उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा हे मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. स्थानिक वृत्तानुसार, तेज प्रताप नगर परिसरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ गोळ्या घालून झा यांना ठार मारण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हॉलच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी संशयावरून काही लोकांना ताब्यात घेतले आहे आणि असे म्हटले आहे की, या हत्येमध्ये भाजप नेत्याचा जवळचा कोणीतरी सामील होता. राज्याच्या राजधानीत भाजपा नेत्याची हत्या झाली असून राज्य विधानसभा निवडणूकीच्या एक महिन्यापूर्वीच ही खळबळजनक घटना घडल्याने तेथील राजकारण तापले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title: Bihar shaked! BJP leader shot dead in broad daylight in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.