Uranium seized: मोठी कारवाई! अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे 7 किलो युरेनियम जप्त; महाराष्ट्र एटीएसकडून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:22 PM2021-05-06T12:22:47+5:302021-05-06T12:32:21+5:30

Uranium seized by Maharashtra ATS: आण्विक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. हे दोघे आरोपी हे युरेनियम खरेदीदाराच्या प्रतिक्षेत होते. तेव्हा एटीएसने सापळा रचून त्यांना पकडले आहे.

Big action by Maharashtra ATS! 7 kg uranium seized worth 21 crore, two arrested | Uranium seized: मोठी कारवाई! अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे 7 किलो युरेनियम जप्त; महाराष्ट्र एटीएसकडून दोघांना अटक

Uranium seized: मोठी कारवाई! अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे 7 किलो युरेनियम जप्त; महाराष्ट्र एटीएसकडून दोघांना अटक

Next

महाराष्ट्रएटीएसने (MaharashtraATS ) मुंबईत आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. अणुबॉम्ब बनविण्यासाठी लागणारे तब्बल 7 किलो युरेनियम (Uranium) जप्त केले असून दोन जणांना अटक केली आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारात 21 कोटी एवढी किंमत आहे. (Maharashtra ATS team arrested two people; seized 7kgs of Uranium)


आण्विक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. हे दोघे आरोपी हे युरेनियम खरेदीदाराच्या प्रतिक्षेत होते. तेव्हा एटीएसने सापळा रचून त्यांना पकडले आहे. हे युरेनियम भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठविले होते, यामध्ये हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. जिगर पांड्या (रा. ठाणे), अबु ताहीर (रा. मानखुर्द) या दोघांना अटक करण्यात आली आहे. जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्याला येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती. यानुसार एटीएसने सापळा रचला व जिगरला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबु ताहीरने हे युरेनियम दिल्याचे सांगितले. 



 


ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी हे युरेनियम एका खासगी लॅबकडे चाचणीसाठी आणि शुद्धता तपासण्यासाठी दिले होते. आता महाराष्ट्र एटीएस या आरोपींना मदत करणाऱ्या त्या खासगी लॅबची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम कुठून आले? त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? याचाही तपास केला जाणार आहे. ही कारवाई पीआय भालेकर आणि नागपाडा टीमने केली आहे. 
 

 

Web Title: Big action by Maharashtra ATS! 7 kg uranium seized worth 21 crore, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.