Big accident avoided! The boat carrying the IPS officers was capsized | मोठा अपघात टळला! आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोट उलटली

मोठा अपघात टळला! आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोट उलटली

ठळक मुद्देआयपीएस मीट वॉटर स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान बोट तलावात बुडाली. या बोटीमध्ये आयपीएस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसह ८ जण होते. सुरक्षा मार्गदर्शकाच्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लाइफ जॅकेट घातले होते, असे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेश - भोपाळमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मोठा अपघात टळला. आयपीएस मीट वॉटर स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान बोट तलावात बुडाली. या बोटीमध्ये आयपीएस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसह ८ जण होते. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या रक्षकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय या बोटीत बसले होते. सुरक्षा मार्गदर्शकाच्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लाइफ जॅकेट घातले होते, असे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले.भोपाळमध्ये आयपीएस कॉन्क्लेव सुरू आहे. गुरुवारी म्हणजेच आज या दोन दिवसांच्या संमेलनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबीय खेळाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. आयपीएस अधिकारी आणि त्याचे कुटुंब बोटिंगचा आनंद घेत होते. दरम्यान, बोट कलंडली. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. 

 

 

English summary :
A boat carrying eight people, including top cops, capsized in Madhya Pradesh today. The accident happened at Badi Jheel in Bhopal when the IPS officers were onboard the boat during a water sports event during their meet.

Web Title: Big accident avoided! The boat carrying the IPS officers was capsized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.