भिवंडीत पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन; १६ दुचाकी जप्त तर अवैध दारू विक्रीचे पाच गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:54 PM2021-06-18T20:54:20+5:302021-06-18T20:55:57+5:30

Combing Operation in Bhiwandi : भिवंडी पोलोसांच्या या कोंबिंग ऑपरेशनने अवैध धंदे कारणाऱ्यांसह चोरट्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. 

Bhimbandi police combing operation; 16 two-wheelers seized, five cases of illegal sale of liquor registered | भिवंडीत पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन; १६ दुचाकी जप्त तर अवैध दारू विक्रीचे पाच गुन्हे दाखल

भिवंडीत पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन; १६ दुचाकी जप्त तर अवैध दारू विक्रीचे पाच गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देभिवंडी शहर पोलीस स्टेशन १७ झोपडयांमधील २७  संशयित व्यक्ती यांची तपासणी करीत १३ रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत

भिवंडीभिवंडी शहरामध्ये मागील काही दिवसात चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, मोबाईल चोरी, घरफोडी व इतर काही मालमत्ता चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली असल्याने पोलीस परिमंडळ क्षेत्रातील सहाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून तब्बल १६ दुचाकी जप्त केल्या असून पाच अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करीत हद्दपार असलेला व्यक्ती बेकायदेशीर पणे शहरात वावरत असल्याने अशांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रातील भोईवाडा, भिवंडी शहर, निजामपुरा, शांतीनगर, नारपोली व कोनगाव या सहाही पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली हे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले . भिवंडी पोलोसांच्या या कोंबिंग ऑपरेशनने अवैध धंदे कारणाऱ्यांसह चोरट्यांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. 

 या कारवाई करण्याआधी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पोलीस संकुल येथे बैठक घेवून करण्यात येणा-या कारवाईचे अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक १२ सहाय्यक पोलीस निरीक्षक , व ९० पोलीस कर्मचारी यांनी मिळून गुरुवारी पहाटे साडेचार वाजता शांतीनगर पोलीस ठाणे हददीत पिराणीपाडा व खान कंपाउंड या ठिकाणी कॉबिंग ऑपरेशन करीत पिराणीपाडा येथील १२ घरे तपासणी करीत ९ संशयित व्यक्ती तपासल्या त्यामध्ये २ रेकॉर्ड वरील गुन्हेगार आढळून आले आहेत . तर परिसरात एकुण ८ संशयित मोटार सायकल मिळून आल्या आहेत. त्यापैकी तीन मोटार सायकल चोरी बाबत गुन्हे दाखल आहेत . त्यासोबत खान कंपाउंड परिसरात ९ घरां मधील ११ संशयित व्यक्तींची तपासणी केली असून तेथून ३ संशयित मोटार सायकली जप्त केल्या आहेत . तसेच शांतीनगर पोलीस ठाणे हददीतील सहा रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची तपासणी करीत दारू विक्री संबंधी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

या कारवाईनंतर सर्व पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली ज्यामध्ये भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत २० घरांची तपासणी करीत ३४ संशयित व्यक्ती तपासल्या असता भोईवाडा पोलीस स्टेशन २० घरे चेक केली व ३४ संशयित इसम चेक करीत ४ संशयित मोटार सायकल जप्त करण्यात आल्या .

भिवंडी शहर पोलीस स्टेशन १७ झोपडयांमधील २७  संशयित व्यक्ती यांची तपासणी करीत १३ रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत. निजामपुरा पोलीस ठाणे अंतर्गत १२ झोपड्या २ लॉज यांची तपासणी करीत ८ संशयित व्यक्ती तपासल्या गेल्या . त्यामध्ये एक हद्दपार असलेला गुन्हेगार बेकायदेशीर पणे राहत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

नारपोली पोलीस ठाणे हद्दीत दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगार आढळून आले तसेच संशयित अजमेरनगर व पटेल नगर परिसरातील झोपडया तपासल्या असता तेथे एक संशयित मोटार सायकल मिळून आली आहे. तर कोनगाव पोलीस ठाणे अंतर्गत १४ सराईत गुन्हेगार यांची तपासणी केली .

          

एकंदरीत भिवंडी परिमंडळ क्षेत्रातील भोईवाडा, भिवंडी शहर, निजामपुरा, शांतीनगर, नारपोली व कोनगाव या सहा पोलीस ठाणे हददीत कोंबिंग ऑपरेशन करून एकूण १६ मोटार सायकल ताब्यात घेत एक  हददपार इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच दारू विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगार हे बहुतांश वेळा रात्रीच्या अंधारात चोरी करण्यासाठी पहाटे पर्यंत घरा बाहेर असल्याने पहाटे केलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अनेक रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासण्याचा उद्देश असल्याने गुन्हेगारां मध्ये खळबळ उडाली आहे .

Web Title: Bhimbandi police combing operation; 16 two-wheelers seized, five cases of illegal sale of liquor registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.