Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:05 PM2020-04-14T15:05:49+5:302020-04-14T15:06:47+5:30

Bhima Koregaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. 

Bhima Koregaon Case: Anand Teltumbde surrenders to NIA pda | Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण

Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण

Next
ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली.

मुंबई -  भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचले असल्याचे सांगितले. 

Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा  


फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि इतर अनेकजणांवर माओवाद्यांचा संबंध असल्याचा आणि सरकार उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदीखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिलं होतं. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. नंतर ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली. 

Web Title: Bhima Koregaon Case: Anand Teltumbde surrenders to NIA pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.