कराटे प्रशिक्षक बनला ड्रग्ज पेडलर; अंबरनाथमध्ये १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 07:00 PM2021-11-30T19:00:54+5:302021-11-30T19:02:15+5:30

Drugs Case : नल्लाकृष्णा मरियप्पन देवेंद्र उर्फ नल्ला असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. तो अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती.

Became a karate instructor, a drug peddler; 10 gm MD drugs seized in Ambernath | कराटे प्रशिक्षक बनला ड्रग्ज पेडलर; अंबरनाथमध्ये १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

कराटे प्रशिक्षक बनला ड्रग्ज पेडलर; अंबरनाथमध्ये १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या ड्रग्ज पेडलरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सोमवारी पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. 

नल्लाकृष्णा मरियप्पन देवेंद्र उर्फ नल्ला असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. तो अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत नल्ला याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. ही पावडर त्याने नवी मुंबईहून सॅमी नावाच्या नायजेरियन व्यक्तीकडून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

नल्ला हा कराटे प्रशिक्षक असून अंबरनाथच्या विविध शाळांमध्ये जाऊन तो मुलांना कराटेचे धडे देतो. मात्र लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने त्याने ड्रग्ज विकण्याचा धंदा सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मागील काही दिवसात अंमली पदार्थांबाबत तक्रारी वाढल्यानंतर उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने एकाच महिन्यात ६ गुन्हे दाखल करत १३ ड्रग्ज पेडलर्सला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २ किलो २९५ ग्रॅम गांजा, १०९ ग्रॅम चरस, १८ ग्रॅम एमडी पावडर हे अंमली पदार्थ आणि रोख रक्कम, मोबाईल, गाड्या असा एकूण ४ लाख ९० हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

 

Web Title: Became a karate instructor, a drug peddler; 10 gm MD drugs seized in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.