भयंकर! चिंचणी बीचवर गर्दीत सुटला वाहनचालकाचा ताबा, अनेक पर्यटक झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:40 PM2022-01-26T19:40:09+5:302022-01-26T22:02:34+5:30

Accident Case : 55 ते 60 वर्षीय वयस्क व्यक्ती कार चालवीत असल्याचे दिसून आले.

Awful! The driver lost control of the crowd on Chinchani Beach, injuring several tourists | भयंकर! चिंचणी बीचवर गर्दीत सुटला वाहनचालकाचा ताबा, अनेक पर्यटक झाले जखमी

भयंकर! चिंचणी बीचवर गर्दीत सुटला वाहनचालकाचा ताबा, अनेक पर्यटक झाले जखमी

googlenewsNext

हितेंन नाईक


पालघर - डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने  झालेल्या अपघातात 10 ते 12 पर्यटक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिंचणी बीचला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून हजारो पर्यटक ह्या बीच ला भेटी देत असतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बुधवारी मोठी गर्दी होती. संध्याकाळी 6.15वाजण्याच्या सुमारास उत्तरे कडून दांडेपाडा भागातून एक कार मोठ्या वेगाने येऊन किनाऱ्यावर भेलपुरी, आईस्क्रीम खायला बसलेल्या पर्यटकांना चिरडून मातीत रुतली. ह्या अपघातानंतर चिडलेल्या शेकडो स्थानिक ग्रामस्थांसह उपस्थित पर्यटकांनी कार ला गराडा घातला.

वसईत आठ लाखांची घरफोडी, माणिकपूर पोलिस हद्दीतील घटना

७ कोटी, ७ आरोपी! मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांचा ढीग केला जप्त

ह्यावेळी 55 ते 60 वर्षीय वयस्क व्यक्ती कार चालवीत असल्याचे दिसून आले. अत्यंत संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी त्या कार ला वेढा घातला. मात्र त्याने स्वतःला कारमध्येच लॉक करून घेतल्याने वाणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.पोलीस वेळीच उपस्थित झाल्याने त्या चालकाची सुटका झाली.

Web Title: Awful! The driver lost control of the crowd on Chinchani Beach, injuring several tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.