धावत्या कारमध्ये भाच्याचा मावशीवर बलात्काराचा प्रयत्न; गळा आवळून रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:16 AM2020-10-11T01:16:33+5:302020-10-11T06:55:18+5:30

उत्तर प्रदेशातील घटना, कारमधून ती भाच्याबरोबर चाललेली असताना त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

Attempt to rape aunt by niece in speeding car In UP | धावत्या कारमध्ये भाच्याचा मावशीवर बलात्काराचा प्रयत्न; गळा आवळून रस्त्यावर फेकले

धावत्या कारमध्ये भाच्याचा मावशीवर बलात्काराचा प्रयत्न; गळा आवळून रस्त्यावर फेकले

Next

कानपूर : उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनऊ महामार्गावर शुक्रवारी धावत्या कारमध्ये एका २५ वर्षे वयाच्या एका महिलेवर तिचा भाचा व त्याच्या मित्राने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने जोरदार प्रतिकार करताच तिचा गळा आवळण्यात आला. ही महिला मेली आहे असे समजून तिला कारमधून रस्त्यावर फेकून देण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हाथरस येथे दलित महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणावरून देशात संतापाचे वातावरण आहे. तरीही उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटना घडतच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबली खेरा गावाजवळ बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेली ही महिला उत्तर प्रदेश एक्स्प्रेसवेज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आॅथॉरिटीच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आढळून आली. त्यांनी याची पोलिसांना माहिती देताच या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर तिची प्रकृती सुधारत असून तिने दिलेल्या जबाबानुसार तिचा भाचा व त्याचा मित्र या दोघांना अटक करण्यात आली. कारमधून ती भाच्याबरोबर चाललेली असताना त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

बालिकेवर बलात्कार : उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्यातील एका गावामध्ये पाच वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. नुकत्याच घडलेल्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Attempt to rape aunt by niece in speeding car In UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.