पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:36 PM2019-06-27T14:36:40+5:302019-06-27T15:05:30+5:30

पाच वषार्पासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला..

attack by knife in suspicion on girlfriend in pimpri | पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार

पिंपरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडून प्रेयसीवर चाकूने वार

Next
ठळक मुद्देतरुणी गंभीर जखमी : प्रियकर अटकेत

पिंपरी : डांगे चौकात एका तरुणीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून हा प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथील डांगे चौकात घडली. 
  गौरी विठ्ठल माळी (वय, २०, रा. डांगे चौक) असे चाकूचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी विकास शांताराम शेटे (वय २१, रा. वाडा, खेड) या तरुणाला अटक केली आहे.
   पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गौरी ही डांगे चौकातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. गौरी आणि विकास एकाच गावातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. विकासने मागील पाच वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन गौरीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तिच्यासाठी त्याने घरदार सोडले. दोघेही चाकण येथे काही दिवस राहिले. त्यानंतर दोघेजण कामानिमित्त मुंबईला गेले. 
  चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे होऊ लागली. त्यामुळे गौरी विकासपासून वेगळी राहू लागली. ती एका खासगी रुग्णालयात काम करू लागली. मागील काही दिवसांपूर्वी विकासने गौरीला एका अनोळखी तरुणासोबत पाहिले. त्यातून त्याच्या मनात त्या दोघांविषयी संशय बळावला. 
   सकाळी दहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. यावेळी तेथे दबा धरुन बसलेल्या आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने  वार केले. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी विकासला अटक केली आहे.  वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत

Web Title: attack by knife in suspicion on girlfriend in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.