Lockdown : खाकीवर पुन्हा हल्ला! सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 09:02 PM2020-04-03T21:02:10+5:302020-04-03T21:07:27+5:30

Lockdown : तेथे उपस्थित नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

Attack on Khaki again! Attack on Police by Collectively in uttar pradesh, kannauj pda | Lockdown : खाकीवर पुन्हा हल्ला! सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर केला हल्ला 

Lockdown : खाकीवर पुन्हा हल्ला! सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर केला हल्ला 

Next
ठळक मुद्देपोलिसांना या घटनेचा व्हिडिओ बनवायचा होता. तेव्हा काही लोकांनी  पोलिसांनी कुऱ्हाडीने व फावडीने हल्ला केला. एसपी प्रसाद यांनी सांगितले की दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे.कागजियाल मोहल्ला येथील साबिरच्या घराच्या छतावर  २५-३० नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.

कन्नौज - उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये लॉकडाऊनदरम्यान शुक्रवारी घराच्या छतावर सामूहिक नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगबाबत सांगितले. तेव्हा तेथे उपस्थित नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस चौकी प्रभारी, एलआययू शिपायासह चार पोलीस जखमी झाले. यानंतर पोलीस ठाण्यातून पोलीस बंदोबस्त पाठविला गेला आणि प्रकरण नियंत्रणात आणण्यात आले. 

 

दरम्यान, पोलिसांना मारहाण करणारे ते तेथून पळून गेले. पोलीस त्या सर्वांचा शोध ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाउन आहे. देशातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रं बंद आहेत. धार्मिक नेत्यांनी घरीच  नमाज अदा करण्याचे सांगितले होते. गुरूवारी मुस्लिम धर्मगुरूंनीही शुक्रवारचा नमाज घरात वाचल्या पाहिजेत, असे आवाहन केले. काही लोकांनीही याची अंमलबजावणी केली. परंतु, सदर कोतवाली परिसरातील कागजियाल मोहल्ला येथील साबिरच्या घराच्या छतावर  २५-३० नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. ही माहिती मिळताच हाजी शरीफ चौकीचे प्रभारी आनंद पांडे, एलआययूचे हवालदार राजवीर सिंह फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले.

जेव्हा पोलिसांनी नमाजनंतर छतावरुन खाली उठणाऱ्या सोशल डिस्टंसिंगचे व लॉकडाऊन पाळण्यास  सांगितले. तेव्हा त्या लोकांमध्ये आणि पोलिसांच्यात वाद सुरू झाला. पोलिसांना या घटनेचा व्हिडिओ बनवायचा होता. तेव्हा काही लोकांनी  पोलिसांनी कुऱ्हाडीने व फावडीने हल्ला केला. चौकी प्रभारी आनंद पांडे यांच्यासह चार पोलीस जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. एसपी प्रसाद यांनी सांगितले की दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आणखी काही लोक फरार झाले आहेत.

Web Title: Attack on Khaki again! Attack on Police by Collectively in uttar pradesh, kannauj pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.