The ATS busted big ISI' conspiracy in the wake of Republic Day | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताचा कट एटीएसने उधळला

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताचा कट एटीएसने उधळला

ठळक मुद्देराशिद सध्या वाराणसीत पोस्टर आणि बॅनर लावण्याचं काम करत होता. एका दहशतवाद्याला मथुरेत अटक करण्यात आली आहे. तर दोन दहशतवादी फरार झाले आहेत. दुसऱ्या कराची भेटीत त्याची चुलत भाऊ शजेबने त्याची आयएसआय आणि पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स असलेल्या अशिम आणि अमद यांची भेट करून दिली.

वाराणसी - लष्कराच्या गुप्तचर विभागासह उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद राशिद (२३) असं अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. चंदौली येथील पडाव परिसरातून राशिदला बेड्या ठोकण्यात आल्या.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, राशिदची सर्व सूत्रे पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआयच्या इशाऱ्यावर चालत होती. जोधपूरमधील भारतीय लष्काराच्या हलचालींची माहिती तो आयएसआयला देत होता.  सीआरपीएफ अमेठीचा माहितीही त्याने आयएसआयला दिली आहे. तो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आयएसआयला पाठवत होता. राशिद सध्या वाराणसीत पोस्टर आणि बॅनर लावण्याचं काम करत होता. रशीदचे नातेवाईक कराचीत राहतात. तो त्यांच्याकडे २०१७ साली दोनदा गेला होता. तसेच २०१८ - २०१९ मध्ये राशीद कराचीत काही लग्नसोहळ्यात देखील उपस्थित राहिला होता. तो कराचीत त्याची आत्या हसीना, तिचा नवरा शागिर अहमद  आणि त्यांचा मुलगा शजेब यांच्यासोबत कराचीतील ओरंगी शहरात राहत असे. दरम्यान कराचीत भेटीतच्या वेळी तो चुलत भावाच्या प्रेमात पडला. तसेच दुसऱ्या कराची भेटीत त्याची चुलत भाऊ शजेबने त्याची आयएसआय आणि पाकिस्तानी मिलिटरी इंटेलिजन्स असलेल्या अशिम आणि अमद यांची भेट करून दिली. या दोघांनी रशिदकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भारतीय फोन नंबर आणि फोटो तसेच महत्वाची माहिती मागवून घेतली.

पाकिस्तानी हॅंडलरच्या सांगण्यावरून राशिदला दोन भारतीय सिम कार्ड अ‍ॅक्टिवेट ओटीपी देण्यात आले होते. भारतीय सिम कार्डपर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह करुन पाकिस्तानी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आपला अजेंडा राबवत होती. राशिदकडून पेटीएमच्या माध्यमातून आलेले ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला आहे. एका दहशतवाद्याला मथुरेत अटक करण्यात आली आहे. तर दोन दहशतवादी फरार झाले आहेत.

Web Title: The ATS busted big ISI' conspiracy in the wake of Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.