Ashwini Bidre Murder Case : पतीने ओळखली मृत पत्नीची डायरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:03 PM2020-02-28T22:03:44+5:302020-02-28T22:08:31+5:30

Ashwini Bidre Murder Case : हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर व राजू पाटील यांची ओळख परेड देखील पार पडली.

Ashwini Bidre murder case: Diary of deceased wife identified by husband | Ashwini Bidre Murder Case : पतीने ओळखली मृत पत्नीची डायरी

Ashwini Bidre Murder Case : पतीने ओळखली मृत पत्नीची डायरी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रथमच या खटल्याचे कामकाज न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात पार पडले.या सुनावणीदरम्यान राजीव गोरे यांची उलटतपासणी देखील आरोपींच्या वकिलांच्या मार्फत घेण्यात आली.

पनवेल - अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमुर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात पार पडली.या सुनावणी दरम्यान आश्विनी बिन्द्रे यांचे पती राजीव गोरे यांची साक्ष पूर्ण झाली. यावेळी हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर व राजू पाटील यांची ओळख परेड देखील पार पडली.
     

Ashwini Bidre case : माझे म्हणणे ऐकाल ना! पोलिसांपासून माझ्या बाबांना वाचवा


प्रथमच या खटल्याचे कामकाज न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या न्यायालयात पार पडले.यावेळी आरोपी अभय कुरुंदकर व राजू पाटील यांना देखील राजीव गोरे यांनी ओळखले. तसेच अश्विनी बिद्रे यांची डायरी देखील यावेळी राजीव गोरे यांनी ओळखली.या सुनावणी दरम्यान राजीव गोरे यांनी अश्विनी बिद्रे हत्याकांडासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय, मुख्यमंत्री तसेच शासनाच्या  विविध खात्यांमध्ये केलेल्या तक्रारींचे दखल घेत त्या तक्रारी अर्जाचे समावेशन या खटल्यात करण्यात आले. या सुनावणीदरम्यान राजीव गोरे यांची उलटतपासणी देखील आरोपींच्या वकिलांच्या मार्फत घेण्यात आली. सरकारी पक्षाचे वकील म्हणून प्रदीप घरत हे देखील यावेळी सुनावणी दरम्यान उपस्थित होते.यावेळी न्यायमूर्ती यांनी या खटल्याची पुढील सुनावणी 6 मार्च रोजी पार पार पडणार असल्याचे स्पष्ट केले. या सुनावणी दरम्यान राजीव गोरे यांची उर्वरित उलटतपासणी होणार आहे.

Web Title: Ashwini Bidre murder case: Diary of deceased wife identified by husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.