आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:31 PM2021-11-23T23:31:35+5:302021-11-23T23:33:16+5:30

Sameer Wankhede : श्रेयसशिवाय २० वर्षीय झैद राणानेही वानखेडेंवर बदला घेतल्याचा आरोप केला होता.

Like Aryan, I was also accused, son of former Mumbai police officer Sameer Wankhede accused | आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

Next

मुंबई झोनचे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. आता मुंबईच्या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने समीर वानखदेवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानप्रमाणेच त्यालाही ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


समीर वानखेडे पुन्हा अडचणीत

हे प्रकरण या वर्षी 21 जूनचे आहे. जेव्हा NCB ने मुंबईच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा श्रेयस अनंत केंजळे याला रात्री अटक केली होती. एनसीबीने घटनास्थळावरून 300 ग्रॅम गांजा आणि 436 एलएसडी ब्लॉट जप्त केले आहेत. आता या प्रकरणात दोन गोष्टी ठळकपणे बोलल्या जात आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आरोपी श्रेयसचे वडील सतत आपल्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे दुसरा आरोप पंचनाम्यासंदर्भात आहे. प्रत्यक्षात श्रेयसला ज्या दिवशी पकडले, त्याच दिवशी स्वत: समीर वानखेडेही इमारतीत गेले होते, अशी चर्चा आहे. त्यांना दिलेले सीसीटीव्ही फुटेजही पाहिले गेले आहे. अशा स्थितीत एनसीबीचा पंचनामा वास्तवापासून कोसो दूर असून, त्यात सत्यता सांगण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

त्याच वेळी, आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्यांनी एनसीबीकडे पंचनामा करण्याची मागणी देखील केली होती, परंतु ती त्यांना दिली गेली नाही. यानंतर त्यांच्या वतीने एनसीबीला अधिकृत मेल लिहिला गेला. आता इथे, श्रेयसच्या म्हणण्यानुसार, त्याने वडिलांना सांगितले होते की हा मेल पाठवून मोठी चूक झाली आहे. आता एनसीबी त्याला मोठ्या प्रकरणात अडकवणार आहे.

खोट्या केसेसमध्ये अडवकल्याचा आरोप

पण श्रेयसच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन काही पुरावे समोर ठेवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज ज्यामध्ये समीर वानखेडे श्रेयससोबत दिसत आहे, त्यातून सर्वात मोठा पुरावा कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. आता एनसीबीला आठवडाभरात या प्रकरणी उत्तर दाखल करावे लागणार आहे. श्रेयसशिवाय २० वर्षीय झैद राणानेही वानखेडे यांच्यावर बदला घेतल्याचा आरोप केला होता. ड्रग्जच्या गुन्ह्यात सात महिने तुरुंगात असलेल्या झैदने सांगितले की, आपल्याला गोवण्यात आले आणि त्याच्या घरी ड्रग्जही पेरण्यात आले. त्यातही वानखेडे हे सीसीटीव्हीत दिसत होते पण पंचनामा करून ते गायब झाले होते.

Web Title: Like Aryan, I was also accused, son of former Mumbai police officer Sameer Wankhede accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.