तलवार बाळगून दहशत पसरविणाऱ्या दाेघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:15 PM2021-10-05T17:15:18+5:302021-10-05T17:15:38+5:30

Crime News : दाेन तलवारी जप्त : स्थागुशा, विशेष पथकाची कारवाई

Arrested two person for spreading terror with sword | तलवार बाळगून दहशत पसरविणाऱ्या दाेघांना अटक

तलवार बाळगून दहशत पसरविणाऱ्या दाेघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देलातूरसह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याच्या सूचना पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत.

लातूर : हातात तलावर घेवून दहशत परसरविणाऱ्या दाेन युवकांना लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दाेन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाणे, एमआयडीसी पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याच्या सूचना पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी विशेष पथकही नियुक्त केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लातुरातील बाभळगाव नाका रिंगराेड परिसरात एक युवक दशहत पसरविण्याच्या हेतूने हातात तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पथकाने रिंगराेड परिसरातील एका काॅम्पलेक्ससमाेरुन एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक लाेखंडी तलवार आढळून आली. याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात अझर अहमद शेख (१९ रा. अंजली नगर, लातूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तर आदर्श काॅलनी ते मंत्रीनगर मार्गावरील ग्रीनबेल्ट परिसरात दहशत पसरविण्याच्या, गुन्हा करण्याच्या उद्देशाने लाेखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी यशाेधन ऊर्फ यश केशवराव कातळे (१९ रा. अष्टविनायक नगर, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.

याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, नाना भोंग, नितीन कठारे, जमीर शेख, चालक नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Arrested two person for spreading terror with sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.