Arnab Goswami : अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही, जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 04:58 PM2020-11-05T16:58:19+5:302020-11-05T16:59:09+5:30

Arnab Goswami : उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल. 

Arnab Goswami: Arnab has no interim relief, bail plea to be hear again tomorrow | Arnab Goswami : अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही, जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी 

Arnab Goswami : अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही, जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी 

Next
ठळक मुद्देउद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे. 

अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबईउच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने बजावली नोटीस. उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल. 

अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अखेर अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे. 

 

Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी रात्री अलिबागमध्ये कुठे मुक्काम केला?

 

घटनाक्रम : अटक प्रकरण


- सकाळी ७ वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या वरळी येथील घरी धडकले.
- सकाळी ८:१५  वाजता : अर्णब गोस्वामी मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.
- सकाळी  ११.३० : पोलीस बंदोबस्तामध्ये अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
- दुपारी १२.१४ : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.
- दुपारी १ : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप.
- सायंकाळी ५ : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर करण्यात आले. 

Web Title: Arnab Goswami: Arnab has no interim relief, bail plea to be hear again tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.