आरटीओ अधिकाऱ्यांशी तरुणाची अरेरावी, संशयिताला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:48 PM2020-08-24T21:48:05+5:302020-08-24T21:48:13+5:30

महिला अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ

argument of youth with RTO officers, suspect arrested | आरटीओ अधिकाऱ्यांशी तरुणाची अरेरावी, संशयिताला अटक 

आरटीओ अधिकाऱ्यांशी तरुणाची अरेरावी, संशयिताला अटक 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता मयुर श्याम जोशी (रा.पहूर कसबे, ता.जामनेर) या तरुणाने मोटार वाहन निरीक्षकांशी अरेरावीची भाषा वापरुन महिला निरीक्षकाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी जोशी याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्याकाळी जोशी याला अटक करण्यात आली.


सहायक मोटार वाहन निरीक्षक पांडूरंग बबन आव्हाड (रा.श्रध्दा कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाजवळ सोमवारी सकाळी निखील अशोक गायकवाड, मोरेश्वर शिवाजी साखरे, गणेश उत्तम लव्हाटे, दीपक एकनाथ ढाकणे, श्रध्दा ज्ञानेश्वर महाजन, दीपक सुखदेव साळुंखे व प्रियंका प्रवीण पाटील आदी सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेट कंट्रोल ड्युटी लावण्यात आली होती. ११.४० वाजता आव्हाड बाहेरुन कार्यालयात आले असता मयुर जोशी हा प्रवेशद्वाराजवळ जोरजोरात आरडाओरड करुन अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत होता. तुम्ही लोकांची मुद्दाम अडवणूक करतात, काम करण्यास परावृत्त करीत आहात असे बोलून लोकांना भडकाविण्याचे काम करीत होता, असे तक्रारीत नमूद आहे.
 

यापूर्वीही गुन्हे दाखल
यावेळी अनेकांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता तो अधिकाऱ्यांशी अर्वाच्च भाषा वापरत होता. यावेळी शेकडो लोक जमले होते. महिला अधिकाऱ्यांशी अरेरावीने करुन शिवीगाळ केली. या प्रकारामुळे सर्व निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शासकीय कामात अडथळा व राष्ट्रीय साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मयुर जोशी हा यापूर्वी आरटीओ कार्यालयात एजंटचे काम करायचा.यापूर्वीही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

 

'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

Web Title: argument of youth with RTO officers, suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.