भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तुविशारदास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 06:20 PM2021-02-20T18:20:49+5:302021-02-20T18:21:31+5:30

Architect arrested in Bhiwandi : गोदाम मालक हे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र असल्याने हे गोदाम बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार व वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानी नागरिकांनी पोलीस व शासकीय यंत्रणेकडे केली होती.

Architect arrested in Bhiwandi warehouse building accident case | भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तुविशारदास अटक

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी वास्तुविशारदास अटक

Next
ठळक मुद्देगोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. २० ) तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड येथे गोदामाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. याप्रकरणी नारपोली पोलोसांनी गोदाम मालका विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र ,गोदाम मालक हे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र असल्याने हे गोदाम बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार व वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानी नागरिकांनी पोलीस व शासकीय यंत्रणेकडे केली होती.

अखेर नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सदर गोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे. सदर वास्तुविशारद हा कोसळलेल्या गोडावून इमारतीचे बांधकामाचा आर्किटेक्ट, सव्र्हेअर व कन्सलटींग इजिनियर असल्याचे व त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली असून शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या कारवाईमुळे अनधिकृत व निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

Web Title: Architect arrested in Bhiwandi warehouse building accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.