Appreciative Work of the traffic police; The life save of woman who committed suicide attempt | वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण
वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

ठळक मुद्देजीव देणाऱ्या महिलेला पुलावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी वाचविलेउपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आहे.

नवी मुंबई - वाशी खाडी पुलावरून उडी मारून एक महिला जीव देत होती. दरम्यान जीव देणाऱ्या महिलेला पुलावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी वाचविले असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. वाशी खाडी पुलावरून जीव देणाऱ्या महिलेला वाहतूक पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पोलीस हवालदार बारसकर, पोलीस नाईक बसरे आणि पोलीस शिपाई म्हात्रे यांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेचा जीव वाचविला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 

 


Web Title: Appreciative Work of the traffic police; The life save of woman who committed suicide attempt
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.