रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपीने जमा केले ७१ नकली नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:22 AM2020-02-26T00:22:23+5:302020-02-26T00:23:55+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपी ग्राहकाने वेगवेगळ्या वेळी १०० रूपयांच्या ७१ नकली नोटा जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Anonymous accused deposited 71 fake notes in RBI | रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपीने जमा केले ७१ नकली नोटा

रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपीने जमा केले ७१ नकली नोटा

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेत अज्ञात आरोपी ग्राहकाने वेगवेगळ्या वेळी १०० रूपयांच्या ७१ नकली नोटा जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान घडली. आरापी ग्राहकाने बँकेच्या पद्धतीनुसार प्रत्येक व्यवहारात ५ किंवा त्यापेक्षा जास्त नोटा जमा केल्या. या नोटांना मुद्रा प्रबंधक केंद्र मुंबई कार्यालयाच्या आदेशावर नाशिक नोट प्रेस येथे पाठवण्यात आले. त्यानंतर या नोटा नकली असल्याची बाब उघडकीस आली. आरबीआयच्या अधिकारी फिर्यादी रोहिणी टिपले यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४८९ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Anonymous accused deposited 71 fake notes in RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.