...अन् एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला पोलिसाच्या हाताला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 07:16 PM2021-01-28T19:16:55+5:302021-01-28T19:19:40+5:30

Crime News : इर्विन रुग्णालयातील घटना; पोलिसाची एचआयव्ही चाचणी

... And an HIV positive patient took a bite from the hand of the police | ...अन् एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला पोलिसाच्या हाताला चावा

...अन् एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाने घेतला पोलिसाच्या हाताला चावा

Next
ठळक मुद्दे. ही घटना १५ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी रुग्णाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने एका आरोपी रुग्णाचे दोन्ही हात पकडले असता, त्याने ४० वर्षीय पोलिसाच्या हाताला चावा घेतला. सदर रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात असल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सदर पोलीस शिपाई यांचीही एचआयव्ही चाचणी करण्यात आली. सदर चाचणी निगेटिव्ह असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना १५ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपी रुग्णाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

 

कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा जामीन फेटाळला; हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप


पोलीस सूत्रानुसार, १२ जानेवारीपासून वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये फिर्यादी कर्तव्यावर होते. तेथे उपचारार्थ आलेल्या मोर्शी तालुक्यातील एका इसमाचे उपचार करताना पोलिसाने डॉक्टरांच्या सांगण्यावरून दोन्ही हात पकडले असता, त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतला. मात्र, त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, आरोपी हा एचआव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर मात्र एकच धावपळ झाली. सिटी कोतवाली ठाण्यात कार्यरत सदर पोलिसाची सदर डाॅक्टरांनी एचआयव्ही चाचणी केली. त्याचा चाचणी अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तसे प्रमाणपत्रही डॉक्टरांनी दिले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अहवालनंतर सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: ... And an HIV positive patient took a bite from the hand of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.